नितेश राणे जर तुम्हाला सोज्वळपणा शिकायचा असेल तर चार दिवस हिजड्यांमध्ये येऊन रहा; तृतियपंथींचा नितेश राणेंना इशारा

0 384

नितेश राणे जर तुम्हाला सोज्वळपणा शिकायचा असेल तर चार दिवस हिजड्यांमध्ये येऊन रहा; तृतियपंथींचा नितेश राणेंना इशारा

 

पुणे : राजकीय नेत्यांकडून राजकारणात बोलताना पातळी ओलांडली जात आहे. त्यातून द्वेषाचं राजकारण सध्या भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. नागपुरातील सभेत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे बद्दल वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते चवताळल्यागत वक्तव्य करताना दिसत आहेत. भाजपचे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना बोलताना तृतीयपंथींचा अवमान करणारे ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समीतीच्या वतीने नितेश राणे यांचा निषेध केला जात आहे. नितेश राणे जर तुम्हाला सोज्वळपणा शिकायचा असेल तर चार दिवस हिजड्यांमध्ये येऊन रहा, तुम्ही आमचे रक्त पिऊन आमचाच अपमान करत आहे. त्यामुळे यांना जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासू असाही इशारा या समितीच्या वतीने दिला आहे.

नागपुरात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे, असे वक्तव्य केल्यानंतर भाजपकडून त्यांचेवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात भाजपचे नितेश राणे यांनी त्यांना प्रतिउत्तर देताना जे ट्विट केले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिजडा हा शब्द वापरल्यामुळे तृतीयपंथींयाकडून नितेश राणे यांचा विशेष केला जात आहे.
याविषयी तृतीयपंथींयांच्या भावना आक्रमक झाल्या आहेत. माध्यमांशी बोलताना त्यानी हिजडा या शब्दाला एक सांस्कृतिक ओळख आहे. न्यायालयानेही आमचं अस्तित्व मान्य केले आहे. त्यामुळे नितेश राणे हिजडा हे नाव घेऊन त्याचा शिवी म्हणून कस काय वापर करत आहेत असा प्रश्न विचारला.
याशिवाय तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला याच भान पाहीजे की आपण काय बोलत आहोत, तुम्हाला आमच्या नातेवाईकांचे मतदान चालत. तुम्ही आमचेच रक्त पिऊन तुम्ही आमचाच वापर शिवी म्हणून करत आहात. नितेश राणे जर तुम्हाला सोज्वळपणा शिकायचा असेल तर चार दिवस हिजड्यांमध्ये येऊन रहा. तुम्हाला आमचे प्रश्न कळत नसतील तर तुम्ही साडी घेऊन सिग्नलला उभे राहा असेही या समीतीच्या वतीने नितेश राणे यांंना सांगितले. नितेश राणे पुरुषी विचारांचा माज असलेला मनुवादी आहे, हा जिथे दिसेल तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समीतीच्या वतीने नितेश राणे यांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.