लोकसभा निवडणुकीवर एस.टी. कर्मचाऱ्यांचा बहिष्कार – मतदान न करण्याचा कर्मचाऱ्यांना घेतला निर्णय

0 518

लोकसभा निवडणुकीवर एस.टी. कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
– मतदान न करण्याचा कर्मचाऱ्यांना घेतला निर्णय

बीड : महाराष्ट्राची लाल परी म्हणून ओळख असलेली एसटी कधी तोट्यात तर कधी नफ्यात गाव खेड्यांना शहरांशी जोडत फिरते. मात्र ही लाल परि ज्या तळहातानी जोपासली जाते ते तळहात आणि ती माणसं नेहमी दुर्लक्षित होत असल्यामुळे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पत्रक व्हायरल होत आहे. यामुळेच एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाज, एसटी आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकार विरोधोत आंदोलन मोर्चे काढून निषेध व्यक्त करीत असतानाच दुसरीकडे लाल परीच्या कर्मचा-यांच्या रखडलेले प्रश्न आणि वेतनवाढ यामुळे एस टी कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ‘आमच तर ठरलं तुमचं काय? तुम्ही पण ठरवा!’ असे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


एस टी महामंडळाच्या वतीने व्हायरल केले जाणा-या पत्रकावर सर्व महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू कूला मात्र एस महामंडळाचे कर्मचारी त्यापासून वंचित असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मनात पगार वाढ होत नसल्याची खंत या पत्रकातून व्यक्त केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत होणा-या मतदानात सहकुटुंब सह परिवाराने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत राज्य सरकारच्या या दुटप्पीपणाचा जाहिर निषेध केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या पत्रकारवर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असल्याने याकडे सरकार खरच लक्ष देणार की अजूनही कर्मचाऱ्यांना या मागणीकडे दुर्लक्ष करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.