अमरावती मध्ये मनोहर कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल – काँग्रेसकडून अटकेची मागणी

0 199

अमरावती मध्ये मनोहर कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल
– काँग्रेसकडून अटकेची मागणी

 

अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख मनोहर कुलकर्णी हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. यामुळे अमरावतीधील राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत मनोहर कुलकर्णी यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी सध्या काँग्रेसकडून केली जात आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आडनावाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी आणि त्यांची वादग्रस्त आणि बालीस वक्तव्य हे समीकरण आता काही नवे राहिले नाही. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीविरोधात वादग्रस्त विधान केलं. ज्यावरून आता काँग्रेससह इतर सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून मनोहर कुलकर्णीला अटक करा अशी मागणी घेऊन राज्यभरात आंदोलने करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.