संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे यांचेकडून यवतमाळ येथील मनोहर भिडेंचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न

0 579

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे यांचेकडून यवतमाळ येथील मनोहर भिडेंचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न

– कुलकर्णींचे बॅनर फाडून निषेध

 

यवतमाळ : मनोहर कुलकर्णी हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख असून ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते यवतमाळ येथिल कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी मनोहर कुलकर्णी यांचे शहरात लावलेले बॅनर फाडून घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यासह कार्यकत्यांना अटक केले.

मनोहर कुलकर्णी यवतमाळ येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर त्यांचे बॅनर लावले होते. परंतू मनोहर कुलकर्णी हे आपल्या कार्यक्रमातून महापुरुषांचा अवमान कररत आहेत. यामुळे जातीय दंगल पेटविण्याचा प्रयत्न मनोहर कुलकर्णी दिसत असल्याने संभाजी ब्रिगेडकडून त्यांचे बॅनर फाडत मनोहर कुलकर्णी मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध केला.

मनोहर कुलकर्णी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर हल्ला केला, यामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ येथे त्यांचे फलक फाडून त्यांचा जाहीर निषेध केला. यावेळी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांच्यासह त्यांच्या अटक केली‌. यावेळी सुरज खोब्रागडे यांनी माध्यमांशी बोलताना, मनोहर कुलकर्णी यांना जर यांना अटक केली नाही, किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.