मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला तात्काळ अटक करा संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

0 232

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला तात्काळ अटक करा संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

 

मंगरुळपीर : मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या व्यक्तीने अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या बद्दल अपमानकारक व बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे संभाजी भिडेला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती सतत बेताल वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करीत आहे. गेल्या काही दिवसात संभाजी भिडे या व्यक्तीने महिला, महापुरुष व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी अनेकदा आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी केली आहे. त्यांची ही वक्तव्ये समाजात तेढ निर्माण करणारी आहे व राज्याचे वातावरण दूषित करणारे आहेत. नुकतेच त्यांनी अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह व अपमानकारक वक्तव्य करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे. अनेक वेळा वादग्रस्त विधाने करणाऱ्या या व्यक्तीवर शासनाने अजूनही कुठलीही कारवाई न केल्यामुळे बेताल वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवत आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी व महाराष्ट्रातील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावे, जेणेकरून राज्यात सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.