सोलापूर मध्ये मनोहर कुलकर्णीच्या पुतळ्याला उलटे टांगून दिल्या पृष्ठभागावर लाथा 

0 300

सोलापूर मध्ये मनोहर कुलकर्णीच्या पुतळ्याला उलटे टांगून दिल्या पृष्ठभागावर लाथा 

 

सोलापूर : महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मनोहर कुलकर्णी यांच्या विरोधात विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षांच्या वतीने राज्यभरात मनोहर कुलकर्णी यांचा निषेध केला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे राष्ट्रवादीकडून मनोहर कुलकर्णींचा प्रतिकात्मक पुतळ्याला उलट टांगून त्याला फाशी देऊन निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी मनोहर कुलकर्णी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या पृष्ठभागावर लाथा घातल्या.

मुंबई, यवतमाळ येथे मनोहर कुलकर्णी यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, भिम आर्मी व बहुजन चळवळींनी प्रयत्न करत मनोहर कुलकर्णी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.