विठोबा माऊलींचे दर्शनामुळे निकालाचा ताण नव्हता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 101

विठोबा माऊलींचे दर्शनामुळे निकालाचा ताण नव्हता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

चिखली : राज्याच्या सत्तासंघर्षाची निकालावर तर्क विर्तक लावले जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजब गजब बोलताना दिसतात. ते म्हणाले की, लहानपणी आई वडिलांसोबत पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घ्यायचो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्या आराध्य देवतेची महापूजा करण्याचे भाग्य लाभले. हा माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण ठरला. विठोबा माऊलींचे दर्शन घेऊन आल्याने कालच्या निकालाचा ताण नव्हता. आपल्या सर्वांच्या लाडक्या विठुरायानेही आपल्या भक्ताच्या बाजूने कौल दिला. पंढरीला गेलो, पांडुरंगाची पूजा केली अन् न्यायालयाचा कौल मिळाला! तणावाच्या प्रसंगात कुठून मिळाले आध्यात्मिक बळ
या मंदिरासाठी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळ (तालुका चिखली) येथील संत चोखोबारायांच्या मंदिराचे लोकार्पण आज शुक्रवारी रोजी पार पडले. हा कार्यक्रम धार्मिक सोहळा असल्याने त्यात राजकीय विषयांवर बोलण्याचे मुख्यमंत्री महोदयांनी टाळले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना त्यांनी जे विधान केले ते ऐकुन लोकांना हसू येण्याची वेळ आली आहे. कारण ते म्हणाले की, आपण जे केले ते कायद्याच्या चौकटीत राहूनच केले. काल मनासारखा निकाल लागला आणि आज संत शिरोमणी चोखोबा यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले. यामुळे मी स्वतःला भाग्यवान मानतो. इसरुळ येथील या मंदिरासाठी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

यापुर्वी ही मुख्यमंत्री महोदयांनी एका ज्योतिषाकडे हात दाखवून नशीब अजमावल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहीले होते, त्यामुळे यांना संविधानिक पदावर बसून असंविधानिक कार्य करताना दिसतात त्यामुळे यांच्याबद्दल लोक खालच्या स्तरावर बोलताना दिसत आहेत. असा देवभोळा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हेच या पुरोगामी महाराष्ट्राचे दर्देव म्हणावे लागेल अशा प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.