सेवानंद वानखेडे साहेबांचा नागरी सत्कार

0 102

सेवानंद वानखेडे साहेबांचा नागरी सत्कार

 

अकोट : सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणारे सेवानंद वानखेडे साहेब पि आय दहीहांडा पोलीस स्टेशन यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन जऊळका ता. अकोट येथील नागरिकांनी नागरी सत्कार करून सन्मानीत केले.

सेवानंद वानखेडे सर आपले कर्तव्य बजावताना सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर असतात. आंबेडकरवादी विचारधारा व चळवळच देशात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ शकते. यावर गाढ विश्वास असणारे सेवानंद वानखेडे साहेब आपले कर्तव्य बजावून सामाजिक कर्तव्याचीही जाणीव ठेवतात. नोकरी व पैसा आल्यानंतर समाजाकडे पाठ फिरवणारे अनेक लोक आपल्या डोळ्यासमोर असतात. परंतु सेवानंद वानखेडे सरांसारखे समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, कायदा व संविधानाची जनजागृती करण्यासाठी सतत झटत असतात त्यांचे हे मौलिक कार्य दुर्लक्षित करून चालणार नाही. सेवानंद वानखेडे सर नेहमी सर्व सामान्य व्यक्तीच्या सानिध्यात राहुन त्यांना आंबेडकवादी चळवळ, भारतीय संविधान याविषयी मार्गदर्शन तर करतात च परंतु तरुणांनी वेगवेगळ्या माध्यमातून अर्थाजन करावे व आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करावे हा त्यांचा सल्ला तरुणांना नेहमी प्रोत्साहन देत असतो. याचीच जाणीव ठेवून व सेवानंद वानखेडे साहेबांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे म्हणून जऊळका ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार सुमेद घनबहादूर साहेब यांच्या हस्ते करून सन्मानित केले. सुमेध घनबहादूर साहेब देखील शासकीय पदाधिकारी असुन आंबेडकरवादी विचारधारा, चळवळ व सामाजिक ऐक्याला प्रोत्साहन देऊन सामाजिक कर्तव्य पार पाडतात. अशा सामाजिक प्रश्नांची जाणिव असलेल्या पदाधिकारी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचावे व इतरांना ही प्रेरणा मिळावी म्हणून जऊळका गावातील आंबेडकरवादी नागरिकांनी हा सत्कार घडवून आणला.
सत्कार समारंभाला माजी उपसभापती ज्ञानेश्वरभाऊ बोरोकार, सरपंच शिलाबाई अवचार, सुमेध घनबहादूर, प्रकाश घनबहादूर, दिपक शेटे, नितेश धांडे, सतिश काठोळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.