भाजी विक्रेत्यां प्रमाणे फळ विक्रेत्यांचेही स्थलांतर करा संभाजी ब्रिगेडची मागणी

0 62

भाजी विक्रेत्यां प्रमाणे फळ विक्रेत्यांचेही स्थलांतर करा संभाजी ब्रिगेडची मागणी

 

परळी (वार्ताहर) : शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांची दोन दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये स्थलांत करण्यात आले आहे. त्यासोबतच मोंढ्या मध्ये भर रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्याचे सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये स्थलांतरित करावे. जेणे करून रस्ता रहदारीला सुरळीतपणा येईल. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

मागच्या दीड वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आंदोलन करून भाजीपाला विक्रेत्ये व फळ विक्रेते यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या मागणीला यश आले असून भाजीपाला विक्रेत्या सोबतच मोंढ्या मध्ये रस्त्यावर फळ विक्रेते फळ विक्री करतात त्यांनासुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये स्थलांतरित करा मुख्य बाजारातून भाजीपाला विक्रेत्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागी स्थलांतरित केले आहे फळे विक्रेत्यांना सुद्धा स्थलांतरित करा अन्यथा भाजीपाला विक्रेत्यांना सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे तसेच मोंढ्यातील गर्दी कमी करून रहदारी सुरळीत करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.