संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा सेलू परळी येथे शालेय साहित्याचे वाटप

0 72

संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा सेलू परळी येथे शालेय साहित्याचे वाटप

 

परळी (वार्ताहर) : संभाजी ब्रिगेड चे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेलु परळी येथे जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. युगनायक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या सूचनेनुसार वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवून करण्यात यावा. त्या अनुषंगाने सेवराम जाधव यांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळा परळी सेलू येथे शालेय साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडचे परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शाळेचे मुख्याध्यापक दहिफळे सर, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग मोरे हे होते तर या कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष शिवाजीराव चौधरी, किसनराव मोरे, आप्पासाहेब सातपुते, दिगंबर सातपुते, देविदास सातपुते ,वसंत डापकर, विष्णूपंत चौधरी, वसंत सातपुते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पोकळे सर, महेश जाधव सर कपिल सायनोड सर, शिंदे मॅडम तसेच कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड शाखा सेलू च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शाखा अध्यक्ष वेंकटेश बदाले, उपाध्यक्ष पांडुरंग सातपुते, संघटक गणेश सातपुते, सचिव बालाजी सातपुते, कोषाध्यक्ष पवन सातपुते, कार्याध्यक्ष पांडुरंग सातपुते, संघटक गोविंद सातपुते , सर्वश्री सदस्य विष्णू सातपुते, श्रीराम सातपुते, अनिल सातपुते, वैभव सातपुते, सोमेश्वर सातपुते, सुदाम सातपुते, गणेश सातपुते, मधुसूदन शिंदे, शुभम कदम या प्रसंगी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.