जिल्ह्यात वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु – साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर

0 8

जिल्ह्यात वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु
– साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर
नांदेड : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ता. १९ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार नागरिकांना बांधकामासाठी योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात टप्‍याटप्‍याने वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी वाळू डेपो सुरू झाले आहेत. या सदरील सेतु केंद्रावर पुढील प्रक्रियेनुसार वाळु मागणीसंदर्भात नोंदणी करावी. वाळू डेपोतून वाळू मागणी करण्‍यासाठी आॅनलाईन प्रणालीवर दररोजी कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्‍येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान दोनशे ब्रास इतकी वाळू बुकींगची मयार्दा निश्चि‍त केली आहे. प्रत्‍येक लाभार्थ्‍याना प्रती महिना दहा ब्रास इतकी वाळू उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.
वाळूसाठी सेतू केंद्रावर संपर्क करा
वाळू डेपोवरुन प्रती ब्रास सहाशे रुपये अधिक इतर कर ७७ रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाºया वाळूच्या प्रमाणात आॅनलाईन प्रणालीवरुन ता. एक फेब्रुवारीनुसार वाळू विक्री करण्यात येणार आहे. ज्‍या नागरिकांना वाळूची आवश्‍यकता आहे त्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.