भ्रष्ट मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

0 103

भ्रष्ट मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

 

 

नांदेड : सर्वच क्षेत्रात बहुतांश अधिकारी कर्मचारी कामचूकार आणि लाचखोर आहेत पण आता शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आजपर्यंत कामावर वेळेवर न येणा-या शिक्षकांचा हा कारनामा सर्वांच्या कानावर आला असेल पण आता चक्क नांदेड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिकेने चारशे रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दि. १७ जून रोजी रंगेहाथ पकडलं आहे.

जिल्ह्यातील किनवट शहरात असणा-या सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिकेने एका विद्यार्थ्यांकडून चारशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी ताब्यात घेतले आहे. सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिका वीणा नेम्मानीवार (वय ४१) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणारा मुलगा हा किनवट शहरातील सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असून तो सातवी उत्तीर्ण झाल्याने त्याला पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे सदरील विद्यार्थ्यांने शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नेम्माणीवार यांच्याकडे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अर्थात टीसी देण्यासाठी रितसर विनंती अर्ज केला होता. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापिका टीसी देण्यासाठी टाळाटाळ करत त्यांनी सहाशे रुपयांची लाच मागितली. त्यानंतर विद्यार्थ्यांने वारंवार विनंती करुनही शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून सतत होणारी पैशांची मागणी पाहून थोड्याशा तडजोडीनंतर चारशे रुपये देण्याचं ठरलं.

त्यानंतर सातवी पास झालेल्या विद्यार्थ्यांने शुक्रवार दि. १६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दि. १७ जून रोजीच लाच मागणीची पडताळणी केली आणि त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाळेतच सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिका नेम्माणीवार यांना रंगेहात पकडले.

या तक्रारदाराने ज्यावेळी मुख्याध्यापिकेकडे दिलेल्या पैशांची पावती मागितली तेव्हा “पैशांची पावती कोणीही देत नाही”, असं सांगत शासकीय पंचासमक्ष लाच स्वीकारली. लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांजरमकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सदरील मुख्याध्यापक महीलेविरोधात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाई नंतर किनवट मधील या शाळेसह इतर शाळांमध्ये एकच खळबळ उडाली असून शिक्षकच जर भ्रष्ट निघत असतील तर त्यांच्याकडून उद्याचे आदर्श नागरिक कसे घडतील अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.