केकाणवाडीत प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

0 309

केकाणवाडीत प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

 

 

केज : (अंजनडोह प्रतिनिधी) तालुक्यातील आडस केंद्रा अंतर्गत येणा-या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकाणवाडी येथे प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

शाळांची उन्हाळी सुट्टी संपुन गुरुवारी दि. १६ जून रोजी शाळा सुरू झाल्या, शाळेत आलेले विध्यार्थी काही नवखे तर काही जुने यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले शाळेतील गुरुजी, शाळेच्या प्रवेशद्वारावरच उभे होते. शाळेच्या समोर सडारांगोळी काढून ते आपल्या शाळेत नव्याने पाऊल टाकलेल्या विध्यार्थ्यांच्या हाती गुलाबपुष्प देण्याची वाट बघत होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडुन वाहणारा आनंद पाहून मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन, सहशिक्षिका तरमिन बानू पठाण, अनिता गायकवाड यांनी नवगतांना गुलाबपुष्प, चॉकलेट, पुष्पहार व पुस्तके देऊन स्वागत केले.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यावर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकातच वहीचे पान समाविष्ट करण्यात आले आहे, प्रथमच असा प्रयोग झालेला असल्याने अशी पुस्तके पाहुन विध्यार्थी हरवुन गेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडुन वाहताना दिसुन आला शाळेने आयोजित केलेल्या प्रवेशोत्सवास बहुसंख्य विद्यार्थासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.