अॅड. प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबच्या कबरीला भेट

0 348

अॅड. प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबच्या कबरीला भेट

 

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे औरंगजेबचा फोटो स्टेट्सला ठेवला म्हणून तणावपूर्ण वातावरण असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घटना समोर आली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवार दि. १७ जून रोजी अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे.

या भेटीत त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलंही अर्पण केल्याच सांगितले जात असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसत आहे. कारण याच औरंगजेब प्रकरणावरून देशासह राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीला का भेट दिली असेल ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.