बिहारमध्ये दलित महीलेला मारहाण करून लघवी केल्याची घटना – माणुसकीला काळीमा फासणारी घटना, महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू

0 108

बिहारमध्ये दलित महीलेला मारहाण करून लघवी केल्याची घटना
– माणुसकीला काळीमा फासणारी घटना, महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू

 

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मध्य प्रदेशप्रमाणेच येथेही लघवीची घटना घडली आहे. येथे गुंडांनी एका दलित महिलेला विवस्त्र करून मारहाण केली आणि नंतर तिच्यावर लघवी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाटणा जिल्ह्यातील खुसरुपूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर दलित वस्तीमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून व्याजावर १५०० रुपये घेतले होते. व्याज आणि मूळ रक्कम परत केली होती. यानंतरही अधिकची रक्कम थकबाकी असल्याचे आरोपींकडून बोलले जात होते. पैसे न दिल्यास गावात नग्न धिंड काढण्याची धमकी त्याच्याकडून दिली जात होती. त्यात शनिवारी दि़ २३ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा दबंग त्याचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांनी तिला बळजबरीने आपल्या घरी नेले. तेथे त्याला विवस्त्र करून काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांनी मुलाला लघवी करण्यास सांगितले. यावेळी कसा तरी जीव वाचवण्यासाठी पळून गेल्याचे पीडितेने सांगितले.
खुसरुपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सियाराम यादव यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत़ मारहाण झालेल्या पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.