उदयनिधी स्टॅलिन यांचा हिंदी दिनाला विरोध – सनातन विरोधी वक्तव्य केल्यानंतर हिंदी विरोधी वक्तव्याने गोेंधळ

0 35

उदयनिधी स्टॅलिन यांचा हिंदी दिनाला विरोध
सनातनवर केलेल्या वक्तव्यानंतर हिंदी विरोधी वक्तव्याने गोेंधळ

 

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची डेंग्यू मलेरियाशी तुलना करून राजकीय वादळ निर्माण केले़ या वादात आता नरेंद्र मोदींनी उडी घेतली आहे़ उदयनिधी यांचा विरोध केवळ सनातनपुरता मर्यादित नव्हता, त्यानंतर त्यांनी हिंदीलाही विरोध केला, यामुळे राजकारणात गोंधळ उडाला आहे़
हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी ही सर्व भाषांमध्ये एकता निर्माण करणारी भाषा असल्याचे सांगतानाच उदयनिधी म्हणाले की, केवळ चार-पाच राज्यांमध्ये बोलली जाणारी हिंदी संपूर्ण भारतीय संघराज्याला एकत्र आणेल हा गृहमंत्र्यांचा दावा चुकीचा आहे का? ते बिगर हिंदी भाषांना प्रांतीय भाषा सांगून त्यांचा अपमान करू नये, असेही ते म्हणाले.
उदयानिधी हे तामिळनाडू येथील युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री आहेत. त्यांनी चेन्नईच्या प्रसिद्ध लोयोला कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत २०२१ मध्ये, उदयनिधी यांनी चेपॉक तिरुवल्लिकनी जागेवरून केवळ निवडणूक लढवली नाही तर जिंकली आहे़ यानंतर २०२२ मध्ये स्टॅलिनने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. मंत्री उदयनिधी यांच्याकडे संघटनेत द्रमुक युथ विंगच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.