भाजप मुस्लिमांना सोबत घेणार ? – मुस्लिमांना भाजप तिकिट देणार नसल्याच्या चर्चेला उधाण

0 17

भाजप मुस्लिमांना सोबत घेणार ?
– मुस्लिमांना भाजप तिकिट देणार नसल्याच्या चर्चेला उधाण

जयपूर : राजस्थानमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांचा सहभाग वाढविण्यासाठी भाजपही गंभीर आहे़ आता मुस्लिम समाजाला सोबत घेऊन काम करणार असा संदेश भाजप देण्याचा प्रयत्न करत आहे़ राजस्थानमध्ये मुस्लिमांना तिकीट दिले जाणार नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे़
राज्यात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणाºया विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजप आपली रणनीती बदलण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे़ भाजपकडून मुस्लिमांच्या मतावर लक्ष ठेवले जात आहे़ ज्यामध्ये मुस्लिम जागांवर भाजपच्या विजयाची पडताळणी करण्यात येत आहे़ या जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे़
आगामी निवडणूकीसाठी भाजप मुस्लिम उमेदवारासाठी गांर्भीयाने विचार करत आहे़ यावेळी भाजपकडून तिकिट वाटपात मुस्लिम दावेदारांचाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ राजस्थानमध्ये अशा ४० जागा आहेत, जिथे मुस्लिम मतदारांची संख्या बºयापैकी आहे़ राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन भाजप आपली रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे़ यावेळी भाजप मुस्लिम उमेदवारांना तिकिटे देऊन खेळ खेळण्याची शक्यता आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.