तिरुपती बालाजी देवस्थानची बस चोरीला – तिरूमला देवस्थानच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर

0 352

तिरुपती बालाजी देवस्थानची बस चोरीला
– तिरूमला देवस्थानच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर

 

तिरूपती : तिरूमला टेकडीवर चोरट्यांनी आपले प्रस्थ माजवले आहे़ चोरट्यांनी शॉपिंग कॉम्पलेक्समधील मालाला हात लावला नसून भाविकांच्या मोबाईलला हात लावला आहे. त्यांनी इलेक्ट्रिक बसही पळवून नेल्याचे सांगण्यात येत आहे़. ही बस तिरूमला तिरूपती देवस्थानद्वारे तिरूमला टेकडीवर प्रवासांसाठी वापरण्यात येणारा धर्मरथ रविवार दि़ २४ सप्टेंबर रोजी पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेची तक्रार पोलिसात दिल्यानंतर बसचा शोध लागला, असून तिरूमला देवस्थानच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हा रथ चालकाने गॅरेजमध्ये सोडला होता़. वाहन चार्जिंग करत असताना चोरट्याने ते पळवून नेले़ रविवार रोजी सकाळपासून ही मोफत बस टीटीडी आगारात नसल्याने कर्मचाºयांनी तिरूमलाच्या सर्व भागाची तपासणी केली़ यानंतर बस चोरीला गेल्याचे उघड झाले़ या प्रकरणाची तक्रार तिरूमला क्राईम पोलिसात दिली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या रथाला जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली होती़ त्यामुळे पोलिस अधिकाºयांनी तिरूपती जिल्ह्यातील केनाईदुपेटा येथे त्याचा शोध लावला़ टीटीडी अधिका-यांसोबत पोलिस तेथे गेल्यानंतर त्यांना हा रथ केनाईदुपेटा येथे मिळाला़ यावेळी हे वाहन बायपास रोडवर सोडून दिलेले आढळले़ यानंतर ही बस पोलिसांनी ताब्यात घेतली़ इलेक्ट्रिक बस चोरणा-या चोरट्याने ती चालवून नायडूपेठमध्ये सोडून दिल्याचे समजते़
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले़ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस बस पळवणाºया चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत़ वार्षिक ब्रम्होत्सवासाठी मंदिरात भाविकांची गर्दी असताना या घटनेने टीटीडी सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आहेत़ यामुळे टीटीडीने याबाबतची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या बस सुब्बारेड्डी यांच्या कार्यकाळात या बस खरेदी केल्या होत्या़ ही बस मेघा आॅलेक्ट्रा ग्रीन टेक लि़ ने दहा बस दान केल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.