साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंचे साहित्य घराघरात पोहोच करा : प्राचार्य बोंडगे एस.डी.

0 57

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंचे साहित्य घराघरात पोहोच करा : प्राचार्य बोंडगे एस.डी.

 

लातूर : दीड दिवस शाळेत गेलेल्या आण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यात नावलौकिक मिळवून वंचित आणि शोषितांचा आवाज बुलंद केला. ते साहित्य आज घराघरात पोहोच करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे आवाहन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य बोंडगे एस.डी. यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त केले.

जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालयात अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा.जाधव स्वाती, प्रा. चव्हाण पल्लवी, प्रा. वारे, प्रा. चव्हाण सुर्दशना, प्रा.पुजा राठोड, सह ग्रंथपाल माने सुजेन, मदने प्रदीप, लिपिक शिंदे दिनेश व य.च.मु.वि. केंद्र संयोजक मोटे संभाजी, अमृत मुदामे व अनंत जाधव हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कार्याला उजाळा देताना, दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या, त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे. जी १९ व्या आवृत्तीत आहे आणि इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. आण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केल्याचे सांगितले. हे साहित्य आज प्रत्येकांच्या घराघरात पोहोच करण्याची जबाबदारी सुशिक्षित तरुणांसह आपल्या सर्वांची असून हेच खरे अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त अभिवादन ठरणार असल्याचे प्राचार्य बोंडगे यांनी सांगितले.
या जयंती कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माने सुजेन यांनी तर आभार दिनेश शिंदे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.