मारेगावमध्ये काढलेल्या महामोर्चाने प्रशासन खडबडून जागे झाले 

0 90

मारेगावमध्ये काढलेल्या महामोर्चाने प्रशासन खडबडून जागे झाले

 

मारेगाव  (लहु जिवतोडे) : मारेगांव तालुक्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या,अतिवृष्टीमुळे झालेला शेतकरी हवालदिल, व शासन प्रशासनामार्फत नेहमी मिळत असलेल्या पोकळ आश्वासना मुळे त्रस्त शेतकरी शेतमजूरांना योग्य न्याय मिळावा यासाठी सोमवारला काँग्रेस कमेटीच्या वतीने निघालेला महामोर्चाने मारेगाव शहर दणानुन गेले या मोर्चाने प्रशासन खडबडून जागे झाले असून उपरोक्त मोर्चात काँग्रेस कार्यकर्त्यां सह शेतकरी मोठ्या संख्येने सामील होते , महामोर्चाचे नेतृत्व काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी केले .
तालुका ओला दुष्काळ जाहिर करा, नदी लगत शेतमालाचा सर्वे करून शेतकर्याना तातडीने मदत द्या, मागील वर्षाचा थकीत पिकविमा देण्यात यावा, तालुक्यातील रोड दुरस्त करा, शेतकर्याना पिककर्ज तातडीने मंजूर करा, विजेचा लपंडाव थांबचा, शेतमाला वरिल जी एस टी कमी करा, थकीत शेतकऱ्यांना कर्ज वसुलीला स्थगीती देण्यात यावी, मणीपूर महिला अत्याचार प्रकरणी दोषीवर कारवाई करा, किरीट सोमय्या अश्लिल व्हिडीओ प्रकरणी चौकशी करून किरिट सोमय्यावर कारवाई करा, तथाकथित संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बाप बदलवण्याच्या वक्तव्य प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा अशा मागण्या घेऊन काँग्रेस कमेटीच्या वतीने सोमवारला दुपारी दोन वाजता स्थानिक नगरपंचायत प्रांगणातून महामोर्चा मार्गक्रमण . करित तहसिल कार्यालय येथे पोहचला यावेळी तालुक्यातील शेतकरी शेतमजुर व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल होते, यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर मडावी, युवक काँग्रेसचे आकाश बदकी, तालुका सेवादलचे प्रफुल विखणकर, तुळशिराम कुमरे, मार्डी चे सरपंच . रविराज चंदनखेडे, अरविंद वखनोर ,अंकुश माफुर, आदिवासी सेलचे आनंद मसराम, महिला अध्यक्ष मायाताई गाडगे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभा कळसकर, अल्पसंख्यांक सेलच्या हुमेरा शरिफ, आदिवासी सेल महिला अध्यक्ष मंजुषा मडावी, , शहर युवक काँग्रेसचे समिर सय्यद, समीर कुडमेथे सह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.