अॅटो रिक्षा संघटनेच्या वतीने अण्णाभाऊंना अभिवादन

0 87

अॅटो रिक्षा संघटनेच्या वतीने अण्णाभाऊंना अभिवादन

लातूर : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचे वाटप करून येणा-या ७ आॅगस्ट होणा-या भारत बंदला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे व ऑटो संघटनेचे जिल्हा सचिव बंडुसिंग ठाकुर यांनी केले.

लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असणाऱ्या ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंतीनिमित्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुक्ती पार्टीचे व ऑटो संघटनेचे जिल्हा सचिव बंडुसिंग ठाकुर बोलत होते. या  कार्यक्रमासाठी वसंत गोरे, बालाजी कांबळे, यशपाल कांबळे, अंबादास सूर्यवंशी, अंबादास जाधव, महमूद खान, बालाजी सूर्यवंशी, मुसा पठाण व संदीप आवटी यांचेसह इतर रिक्षाचालक उपस्थित होते.

यावेळी बहुजन विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहीती सांगून राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतच्या वतीने सात ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या भारत बंदला पाठिंबा द्या असे आवाहन मुक्ती पार्टीचे व ऑटो संघटनेचे जिल्हा सचिव बंडुसिंग ठाकुर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.