वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकांना शिस्त लावा संभाजी ब्रिगेडची देवल कमिटी अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

0 69

वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकांना शिस्त लावा संभाजी ब्रिगेडची देवल कमिटी अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 

परळी (वार्ताहार): येथील वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकांना शिस्त लावावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशासह जगभरातून भावीक भक्त येतात. मंदिरात शिस्त लावण्यासाठी महिला सुरक्षारक्षक आहेत पण या सुरक्षारक्षक भाविकांसोबत असभ्यवर्तन करत असतात असे अनेक वेळा आढळून आले आहे. आरडाओरडा करून बोलणे, भाविकांवर रागावणे, भाविकांसोबत गैरवर्तन करणे, भाविकांना अपमानास्पद वागणूक देणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या महिला सुरक्षारक्षकांची दुसऱ्या ठिकाणी ड्युटी लावून त्या ठिकाणी सभ्य वागणुकीसाठी तंबी देऊन दुसऱ्या महिला सुरक्षारक्षक नेमाव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वैद्यनाथ देवल कमिटी अध्यक्ष तथा परळी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.