राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परळी वै.तालुकाध्यक्ष पदी देवराव लुगडे महाराज यांची निवड

0 16

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परळी वै.तालुकाध्यक्ष पदी देवराव लुगडे महाराज यांची निवड

 

परळी (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परळी तालुकाध्यक्ष पदी देवराव लुगडे महाराज यांची निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा लोकप्रिय आ. संदीप भैया क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे, ज्येष्ठ नेते समदभाई शेठ यांच्या उपस्थितीत नुकतीच देवराव लुगडे महाराज यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्ती बद्दल देवराव लुगडे महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार असून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार असून येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी व्यक्त केले आहे. या निवडीबद्दल परळी मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यातून लुगडे महाराज यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.