खा.शरदचंद्र पवार साहेबांना मानणाऱ्या स्वाभीमानी कार्यकर्त्यांची लाट उसळणार -आ.सदिप क्षिरसागर

0 16

खा.शरदचंद्र पवार साहेबांना मानणाऱ्या स्वाभीमानी कार्यकर्त्यांची लाट उसळणार -आ.सदिप क्षिरसागर

बीडच्या सभेला हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा परळीत निर्धार

परळी (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खा शरदचंद्रजी पवार साहेब यांची बीड येथे 17 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होत असून या सभेच्या पूर्वतयारी बैठक अक्षदा मंगल कार्यालय परळी वैजनाथ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप भैया क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख हे होते तर या बैठकीसाठी माजी आमदार सय्यद भाई सलीम, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे हे उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सभेला मोठ्या संख्येने परळी मतदारसंघातील जनतेने उपस्थित राहावे तसेच येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व ताकतीने जनतेने पुढे यावे असे आव्हान याप्रसंगी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांनी परळी मतदारसंघातील जनतेने कायमच पवार साहेबांना साथ दिली आहे. पूरोगामी विचाराला मानणारा हा मतदारसंघ, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारा हा मतदारसंघ येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीमय होईल तसेच अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणारा दोषी असतो म्हणतात. शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा असे सुद्धा याप्रसंगी मेहबूब भाई शेख यांनी म्हटले. बीड जिल्ह्यामध्ये दोन विचाराचे लोक राहतात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचे व दुसरे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराचे लोक आहेत. त्या विचाराच्या लोकांनी कायम बीड जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. त्या विचाराला पुढे नेण्यासाठी पवार साहेबांच्या पाठीमागे लोकांनी उभे राहावे तसेच कुठल्याही प्रकारच्या धमकीला दादागिरीला बळी न पडता कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने पुढे यायला पाहिजे असे आव्हान महेबूब भाई शेख यांनी केले. तसेच याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सौ सुदामतीताई गुट्टे यांनी परळी मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा व सध्याचे प्रश्न यावर मनोगत व्यक्त करताना परळी मध्ये काही नेत्यांनी दादागिरी गुंडागर्दी दहशत भ्रष्टाचार माजवण्याचा प्रयत्न केला आहे. विकास तर केलाच नाही. या लोकांच्या कसल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता परळी मतदारसंघातील जनतेने पुढे यावं तसेच नेतृत्वाने परळी मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यावं असे आव्हान याप्रसंगी सौ सुदामतीताई गुट्टे यांनी केले.
या बैठकीच्या प्रसंगी माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे परळी शहराध्यक्ष बहादुर भाई ,शंकर शेजुळ, अक्षय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते समदभाई शेठ, जमील अध्यक्ष, अश्फाक शेख, नरेश हालगे, विश्वनाथ देवकर, हनुमंत बाप्पा सोळंके , दत्ता शिंदे, अविनाश हरे, भागवत मुंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले सूत्रसंचालन अभिमन मुंडे यांनी तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक कार्याध्यक्ष शुभम नागरगोजे यांनी मांनले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करण्याच्या व शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परळी तालुका अध्यक्षपदी देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्षपदी ॲड जीवनराव देशमुख ,तालुका कार्याध्यक्षपदी रमेश ढाकणे, शहर कार्याध्यक्ष महबूब कुरेशी, युवक तालुका अध्यक्ष शंकर शेजुळ, युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज, युवक तालुका कार्याध्यक्ष शुभम नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचे कार्य आम्ही पूर्ण ताकतीने करू असे आश्वासन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.