गुल्लेर बाई मी संतीन…

0 34

गुल्लेर बाई मी संतीन…

 

नरेंद्र इंगळे, अकोट

“ओ कमलाबाई.. दोन गोष्टी सांगा तुमच्या पोराले”
“काय केलं त्यानं? ”
“मले पाहून हवेतून कीस केला.. मी दारात उभी होती.. तो चौकात उभा होता.. मले पाहून त्यानं मुका देला”
“तुह्या घरात येऊन देला काय? ”
” चौकात उभा होता तो.. ”
“माहा पोरगा तुले कायले मुका देईन? तू दोन लेकराची माय आहेस..तोंडावर वया पडल्या.. त्याले मुकाच द्याचा होता तं जवान पोरीले देला असता.. तुले देऊन काय फायदा? ”
“त्यानं मलेच पाहून असा हात केला.. ”
“तू कायले दरवाज्यात उभी राह्यली? दोन लेकरं झाल्यावर घोडी सारखी मटकत राह्यतं… तोंडाले मेपक करत राह्यतं.. जवान पोरी सारखी दरवाज्यात उभी राहून नयतुरन्या पोरावर नजरा मारतं? शोभतात काय हे धंदे तुले? ‘
“मी फक्त उभी होती.. त्यानं कायले मुका देला? ”
“तुलेच कशावरून देला? चौकात लय घरं आहेत.. तू कायले जवान पोरावर ध्यान देऊन राह्यली व? ”
“चूक त्याची आहे.. मी माह्या नवऱ्याले सांगतो”
“जाय सांग.. तोच तुले रट्टे देते.. दरोज्यात उभं राह्याचं काही कामच नाही.. कामधंदा नाही काय तुले? ”
“तुम्ही सोताचं झाकून ठेवता अन दुसऱ्याचं वाकून पाह्यता.. पोरगा हूडपना करते हे दिसत नाही काय तुमाले? लगन करून टाका त्याचं”
“मी त्याचं लगन करीन नाहीतर मुंज्या ठेवीन.. तू कोन सांगनारी? गावभर चरते अन मले शिकोते”
“बाप्पा.. कधी चरली मी गावभर? ”
” मले सारं ठाऊक आहे.. तुही पुरी खानदान वयखतो मी.. तुहे लग्नाच्या आगुदरचे सारे ढंगरे ठाऊक आहेत मले.. मावसबहिनच्या घरात घुसली अन तिचाच नवरा मटकाऊन बसली”
” हे लय झालं.. असा भलकाई आरोप लाऊ नका माह्यावर ”
” आरोप कायचा? साऱ्या जनतेलेच ठाऊक आहे.. कोर्टालोक केस गेली होती.. तुले वाटते कोनाले ठाऊकच नाही? ”
“एवढं खोलात जायाचं काम नाही.. मी फक्त तुमच्या पोराचा करीना सांगाले आली होती ”
” आगुदर सोताची धून याव मंग दुसऱ्यावर आरोप कराव.. चालली मोठी आरोप कराले खरकटी..! मोठी देवधरम करते.. देवळात जाऊन घंटी वाजोते.. काय कामाची व? बाई मी संतीन अन माह्या मागं दोनतीन! “

Leave A Reply

Your email address will not be published.