बहुजन मुक्ति पार्टी युवा आघाडीच्या भादा सर्कल प्रमुखपदी डॉ.निशांत उबाळे यांची निवड

0 112

 

 

औसा :  बहुजन मुक्ति पार्टी लातूरचे जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर यांनी शुक्रवार दि. ३० जून रोजी बहुजन मुक्ति पार्टी औसा तालुका युवा आघाडीच्या भादा सर्कल प्रमुखपदी डॉ.निशांत उबाळे यांची निवड करण्यात आली.

तालुक्यातील भादा येथे बहुजन मुक्ति पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघडी भादा सर्कल प्रमुखपदी डॉ.निशांत उबाळे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना बहुजन मुक्ति पार्टीची दिशा आणि ध्येयधोरणे समजून सांगण्यात आली. यावेळी या कार्यक्रमासाठी स्थानिक युवक कार्यकर्ते भरत साबळे,यादव कबीर हिंगे,उबाळे यशवंत शंकर,महादेव जालिंदर गवळी, ग्यानदेव कोंडीबा उबाळे, मलिक दिलीप कांबळे, ऋषभ उबाळे,अक्षय खंडू उबाळे, अजय खंडू उबाळे,सचिन उबाळे सिद्धांत उबाळे,जनमनजय गायकवाड, उपस्थित होते , व साथ-सहयोग करण्यासाठी शाश्वती दिली, या कार्यक्रमास बहुजन मुक्ति पार्टी चे जिला सचिव मा. बंडूशिंग भाट (ठाकुर ) व बहुजन मुक्ति पार्टीचे युवा शहरअध्यक्ष मा.प्रेम शिंदे इत्यादि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.