परळी मध्ये कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का संभाजी ब्रिगेडचा सवाल

0 65

परळी मध्ये कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का संभाजी ब्रिगेडचा सवाल

परळी : शहरात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का नाही..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला असून मागच्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे कायदा व सुव्यवस्था ढासळल्याच परळीकरांना पहायला मिळत आहे.
पोलीस प्रशासन कोणात्या कारणाने कमी पडत आहे ? हा सवाल संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. मागील काही दिवसापूर्वी बरकत नगर येथे भर दिवसा वरदळीच्या ठिकाणी एका इसमाचा खून झाला, परवा भर मोंढ्यात किन्नर लोकांमध्ये मारहाण झाली एक किन्नर त्यामध्ये गंभीर जखमी झाल. परवा पोलीस स्टेशनच्या समोर वयक्तिक वादातून पोलीस स्टेशनच्या दारामध्ये दोन गटांमध्ये 100 ते 200 लोकांत तुंबळ मारामारी झाली. पोलीस उघड्या डोळ्यांनी बघत बसल्याच पहायला मिळत आहे. तसेच परत बायपास रोड वरती एका गुत्तेदाराचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. दररोज मारामाऱ्या, लुटमार, चोरीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून वारंवार परळी मध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याच पाहावं लागत आहे. यावरती पोलीस प्रशासनाचे कसलंही नियंत्रण राहील नसून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने या सर्व ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती सतर्क होऊन बिघडत चाललेली परिस्थिती नियंत्रणात आणावी अन्यथा परळीमध्ये दररोज अनुचित प्रकार झाल्याशिवाय राहणार नाहीत. वाईट पद्धतीचे वातावरण सध्या तरी आपल्याला पाहावयास मिळत आहे. या वातावरणावर पोलीस प्रशासनाने नियंत्रण मिळवावे अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.