भारताच्या एलिझाबेथ : अहिल्यामाई होळकर

0 539
भारताच्या एलिझाबेथ : अहिल्यामाई होळकर”

 

 नवनाथ दत्तात्रय रेपे
  (भट बोकड मोठा)
  या पुस्तकाचे लेखक 
   मो. ९७६२६३६६६२

 

“धन्य धन्य चोंडीगाव !
जेथे धूळ माजी उमटले राजमातेचे पाव !!
महानायिका आहिल्यामाईंबद्दल संभाजी ब्रिगेडचे शिवश्री गंगाधरजी बनबरे म्हणतात की, ‘अहिल्यामाई ही या देशातल्या प्रत्येक संकटग्रस्त झालेल्या स्त्री आणि पुरूषाला ऊर्जा देऊन संकटाला उध्वस्त करून यशस्वी होण्याकरीता प्रेरणा देणारे एक महान असे टँनिक आहे’. तर इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’ म्हटले आहे. त्या अहिल्याबाईंचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव आहे. शिवरायांचे रायगडावरील पहिले स्मारक झाले ते तुकोजीराव होळकर यांच्या पैशातून झाले. तसेच जगाला शिवराचरित्र माहीत व्हावे म्हणून कृष्णराव केळुसकरांनी इंग्रजीमध्ये पहिलं शिवचरित्र जे १९०६ साली लिहल ते प्रकाशित करून जगातल्या सर्व ग्रंथालयांमध्ये गेलं पाहीजे, म्हणून त्याकाळी ३५ हजार रूपयांची मदत करणारे राजे म्हणजेच होळकर आहेत.
“वैदिक धर्म नाकारतो स्त्री शिक्षण !
वैदिक भटांचे भेदभाव वेद पुरण !
मुलनिवासी रहावेत अज्ञान !
हेच भटांचे ध्येय असते  !!”
त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसताना तसेच वैदिक धर्म हा स्त्रीयांना शिक्षण नाकारत होता तरीही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले. राजमाता अहिल्यामाई होळकर बुद्धीमान, हुशार, चपळ, चाणाक्ष असे सर्वगुण संपन्न होत्या. त्यांना मोडीलिपी वाचता व लिहता येत होती. आजच्या आमच्या महिलांना माहेश्वरी साडी महीत आहे पण ती निर्माण करणारी राजमाता अहिल्यामाईच माहीत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
अहिल्यामाईंचा विवाह २२ मे १७३३ साली खंडेराव होळकर यांच्या सोबत झाला होता. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या. ते अहिल्यामाईंना सांगत होते की, तुला आधुनिक काळातली ताराराणी व्हायचे आहे. तुला जिजाऊंचा वारसा पुढे चालवायचा आहे. त्यामुळे ते अहिल्याबाईंना घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालविणे, डावपेच आखणे, कर वसुली करणे, न्याय दान करणे या सर्व बाबींचे धडे त्यांना त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी दिले होते.
“शुरवीर खंडेराव झाला पती !
जुळली खंडेराव अहिल्यांची नाती !!”
त्यानंतर १२ वर्षांनी खंडेराव होळकर मृत्यू पावले. तेव्हा वैदिक धर्मानुसार सती जावे लागत होते तेव्हा खंडेरावाच्या आकरा बायका सती गेल्या परंतू अहिल्यामाई सती गेल्या नाहीत व त्यांनी केशोपनही केले नाही. त्यावेळी त्यांना सासरे मल्हारराव होळकर व सासू गौतमीमाईंनी साथ दिली होती. शहाजी महाराजानंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत, तसेच खंडेराव गेल्यानंतर अहिल्यामाई सती गेल्या नाहीत आणि जोतिराव फुले गेल्यानंतर सावित्रीमाई सती गेल्या नाहीत. या महीलां सती गेल्या असत्या तर इतिहासच बदलून गेला असता मग आम्ही आज कुठल्या तोडानं जय जिजाऊ जय अहिल्या अन् जय सावित्री म्हटलं असतं. अशा या क्रांतीकारी महिलांनी वैदीक धर्मव्यवस्थेला छेद देऊन त्यांचे धर्मग्रंथ लाथाडण्याचे महान कार्य केलं आहे हे आजच्या आमच्या महीलांनी समजून घेतलं पाहीजे.
आमच्या बहुजन समाजाला फक्त अहिल्यामाई हातात पिंड घेतलेल्या तसेच त्या मंदीरे बांधणा-या होत्या एवढेच माहीत करून देण्यामागे या मनुवादी विकृतींचा सर्वात मोठा हात आहे. ही मनुवादी चाल आता आमच्या बहुजनांनी लक्षात घेतली पाहीजे. राजमाता आहिल्यामाईंचे त्यापलीकडेही कार्य आहे. अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार केला होता. ज्याप्रमाणे कुळवाडीभूषण छ. शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमध्ये उत्तम राजे होते तसेच अहिल्यामाई या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होत्या. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यामाई ही एक महान स्त्री होती. तसेच अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. “अहिल्यामाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. त्यांचे स्वतंत्र हेरखाते होते. मध्य भारताच्या इंदूर मधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. एकदा अहिल्यामाई दरबारात बसलेल्या असताना चंद्रचुड आला आणि म्हणाला की, ‘आता होळकरांच्या घराण्याला कोणी वंश उरला नाही माझी आपल्याला एक विनंती आहे की एक ब्राम्हण मुल दत्तक घ्यावं आणि हे राज्य पुढ चालवावं’. तेवढ्यात अहिल्यामाई सिंहासनावरून ऊठुन चंद्रचुंडवर कडाडताना म्हणाल्या की, ‘मूर्खा तोंड संभाळ’, ‘ही होळकरांची रियासत आहे, ही होळकरांची रियासत कोणाची खुषमस्करी करून मिळवलेली नाही. तर ही मल्हाररावांच्या तलवारीच्या बळावर मिळवलेली रियासत आहे’. आणि या रियासतीचं काय करायचं दान करायची की, कोणाला दत्तक घ्यायचं हे ठरवण्यासाठी मी अहिल्या स्वतः सक्षम आहे. हे राज्य निर्माण करणारा माझा सासरा मल्हारराव त्यांची मी सून आहे. माझा नवरा खंडेराव या राज्यासाठी मेला त्याची मी बायको आहे. माझा मुलगा मालेराव या राज्यासाठी मेला त्याची मी आई आहे. एकाची सून एकाची बायको आणि एकाची आई जिवंत असताना तुझी हिमंत कशी झाली. की, हे राज्य बरखास्त करा म्हणण्याची. यावर चंद्रचुडची बोलतीच बंद झाली होती. पेशवे काय आमचे मालक आहेत का ? त्यांना काय अधिकार आहे आमच्या राज्यात ढवळाढवळ करण्याचा त्यांनी त्याच्या लायकीने राहावं हे शिवाजीचं राज्य आहे, हे माझे सासरे मल्हारावांनी तलवारीच्या बळावर कमावलेलं राज्य आहे आणि पेशवा कोण लागून गेला, माझ्या राज्यात हस्तक्षेप करणारा त्यांने त्याच्या लायकीने रहावं. हे उद्गार होते अहिल्यामाईंचे म्हणजे किती जरब असेल जरा विचार करा. त्यांना कसं घडवलं होतं मल्हाररावांनी हे स्पष्ट दिसते. परंतू अशी अहिल्यामाई कोणी आमच्या बहुजन समाजाला सांगितलीच नाही, सांगितली ती फक्त हातात पिंड घेतलेली आणि मंदिर बांधणारी आणि तेच आमचा समाज सत्य माणुन बसला ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
त्याकाळामध्ये ज्या धर्मग्रंथांनी स्त्रीयांना त्यांचे हक्क व अधिकारापासून दूर ठेवल होतं तेव्हा अहिल्यामाईंनी त्यांच्या राज्यात स्त्रियांची स्वतंत्र फलटण उभी केली होती. भारत देशामध्ये महिलांची स्वतंत्र फौज निर्माण करणारी महाराणी अहिल्यामाई होती म्हणून त्यांना विरांगणा ही म्हटले जाते. त्यांनी महिलांना शस्त्रात्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी केवळ अर्ध्या तासात ५ हजार महिलांची फौज उभी केली होती. तसेच त्यांच्या अंगरक्षक ह्या सर्व स्त्रिया होत्या. जगाला वंदनिय असं कार्य अहिल्यामाईंनी केलं त्यात धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भाषा, संस्कृती, युध्द शास्त्रकला – निती तसेच विविध कायद्यांची निर्मीती अहिल्यामाई होळकरांनी केली. त्यातील अनेक कायदे १९५५ पर्यंत आपल्या देशात लागू होते. जगाला अभेद्य होईल अशी आपली सून अहिल्याबाई घडवण्याच कार्य हे मल्हारराव व गौतमीमाईंचे आहे म्हणून हे जगातले ‘आदर्श सासू – सासरे’ म्हणूनही पाहीलं पाहीजेत.
अहिल्यामाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५, इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले आहे. तसेच अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव ‘देवी अहिल्यामाई विमानतळ’ असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास ‘देवी अहिल्या विश्वविद्यालय’ असे नाव देण्यात आले आहे. परंतू याच महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाला माहानायिका अहिल्यामाईंचे नाव देण्यासाठी मोर्चो आणि निर्दषने करावी लागताहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे.
आज आमच्या तरूण तरूणींच्या पुढे जिजाऊ, अहिल्यामाई, सावित्री यांचे चरित्र आयडाँल म्हणून समोर आणलं पाहीजे. ते तरूणांनी वाचलं पाहीजे. याविषयी भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’ मात्र आमचे लोक महापुरूषांची चरित्र न वाचताच नाचत बसतात आणि जयंती साजरी करतात. पण नाचण्याने फक्त अंगातुन घाम येतो परंतू वाचण्याने ज्ञान प्राप्त होते हे आमचा तरूण वर्ग विसरला आहे की काय ? हा प्रश्न पडतो.
अहिल्यामाईंचे जिवन चरित्र म्हणजे आजच्या मनोरूग्ण झालेल्या मानसिक आजार ग्रस्त झालेल्या तसेच लाचार आणि दिनवाण्या झालेल्या बहूजन समाजामध्ये क्रांतीचा अगार फुलवणारे जिवन चरित्र आहे. म्हणून ते जिवन चरित्र प्रत्येकांच्या घराघरात पोहोचले पाहीजे तेव्हाच खरे राजमाता अहिल्यामाईंच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन ठरेल.
Leave A Reply

Your email address will not be published.