गटविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी सोळंके कुटुंबियांचा तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

0 216

गटविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी सोळंके कुटुंबियांचा तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

अंजनडोह (प्रतिनिधी) :  धारूर तालुक्यात अंजनडोह शिवारात बालासाहेब हरिभाऊ सोळंके यांची ९० आर आणि महानंदा कृष्णा सोळंके यांची १ हेक्टर २३ आर जमीन असुन या जमिनीत बोअरवेल व विहिर आहे त्याला पाणी चांगले असुन ही बागायती जमीन आहे. या शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी,पंचायत समिती धारूर यांची तोंडी परवानगी घेऊन शेतात मोहगणीची झाडे लावलेली आहेत. त्यामुळे शेती पेरणी योग्य राहिलेली नसल्याने शेतकरी कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे.
पंचायत समिती धारूर यांच्याकडे या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, सक्षम अधिकाऱ्यांनी फाईल्सवर स्वाक्षऱ्याही केलेल्या आहेत. गटविकास अधिकारी हे तांत्रिक मान्यता न देण्याच्या उद्देशाने उडवाउडवीची उत्तरे देत आहेत व इतर कार्यालयाकडे जा,असे बोलत आहेत, तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव मान्य न केल्यास आमचे आर्थिक नुकसान होऊन शेती देखील झाडांच्या लागवडीमुळे नापिकी होऊन गेली आहे. आम्हाला वेळीच पंचायत समिती मार्फत म.ग्रा.रो.ह. अंतर्गत अनुदान नाही मिळाले तर आमचे कधीही न भरून येणारे आर्थिक नुकसान होणार आहे, असे बालासाहेब हरीभाऊ सोळंके व कृष्णा आत्माराम सोळंके या शेतकऱ्यांनी निवेदनात नमुद केले. यांनी दि. १९ जुन रोजी पासुन तहसिल कार्यालय धारूर येथे आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

तहसीलदार धारूर यांनी गटविकास अधिकारी धारूर व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी सुचना देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना उपोषणा पासुन परावृत्त करावे, अशा सुचना दिल्या आहेत, परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या सुचनेला प्रतिसाद दिला नाही. “शासन आपल्या दारी “या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी गावपातळी पर्यंत स्वत: फिरत आहेत. पंचायत समितीला मात्र या उपक्रमाचा विसर पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.