पोथी पांचांगाला मुठमाती देत लाहुडकरांचा गृहप्रवेश

0 444

पोथी पांचांगाला मुठमाती देत लाहुडकरांचा गृहप्रवेश

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे)  : गृहप्रवेश म्हटलं की पोथी पुराण आणि पांचांगाचा पसारा मांडून त्यात पुजन सर्रासपणे केलं जातं. पण याला फाटा देऊन गृहप्रवेश होत आहेत, आज दि. १८ जून रोजी रवी लाहुडकर यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तींचे पुजन करून गृहप्रवेश केला. त्यांनी या गृहप्रवेशाच्या माध्यमातून समाजाला एक आगळावेगळा वेगळा संदेश देण्याचे काम केल्यामुळे त्यांच कौतुक होताना दिसत आहे.
पुणे येथिल भोसरी येथे राहणारे पत्रकार रवी लाहुडकर यांनी आपल्या आपल्या घराच्या नवं वास्तुमध्ये प्रवेश करतेवेळी भटजी आरती पुजा पाठ आणि पांचांगाला तडीपार करत आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करून गृहप्रवेश केला. या गृहप्रेवशाला आलेले पाहुणे देखिल अचिबीत होऊन हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम पाहत होते. त्यानंतर उपस्थित पाहुण्यासमक्ष रवी लाहुडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून हा गृहप्रवेश केला.


रवी लाहुडकर हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये असणाऱ्या घाटपूरी गावचे रहिवासी असून त्यांनी पुण्यातील आपल्या नव्या घराच्या गृहप्रवेश कार्यक्रमातून पोथी पाचांगाला मुठमाती देऊन आलेल्या पाहुण्यांपुढे एक नवा आदर्श घालून दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.