राम सितेचा की मिशीचा

बहूजन समाजातील शिकला सवरलेला उच्चशिक्षित जिवंत राम दोन वेळच्या जेवणाला मौताल तर झालाच आहे पण त्याचा भाऊ लक्षमण बंद पडलेल्या शाळामुळे शिक्षणापासून वंचित तर त्यांचा बाप दसरथही शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे झाडाला दोरखंडाने फास घेतोय मग आमचा बहुजनांचा जिवंत असलेला खरा राम जर येवढा दु:खात डुबलेला असेल तर त्याने अयोध्येतील दगडी रामासाठी व त्यांच्या निर्जीव मुर्तीसाठी काय म्हणून आनंद साजरा करावा ?.

0 241
राम सितेचा की मिशीचा

 

रेपे नवनाथ दत्तात्रय
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com

 

कोरोना या महाभयंकर कोरोना षंढयत्राने संपूर्ण जगाला वेढीस धरले असल्यामुळे केंद्र सरकारनं त्यावर योग्य तोडगा काढण्याऐवजी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून वातावरण भयभित करून देश लाॅकडाऊन केला. त्यामुळे विकासाची मंद गतीने फिरणारी चक्रे एकदाची थांबली आणि लोकांच्या पोटाला एकदाचं लाॅक लागून लोक डाऊन झाले. पण याचं लोकांना जर का धर्माचा गांजा पाजला तर त्यांना धर्माची नशा येते हे ओळखून केंद्र सरकारनं हिंदू धर्माची आस्था ओळखून राम मंदीर भुमिपुजन करण्याचा निर्णय घेतला पण प्रत्येक वेळी लहान शेंबड्या मुलांप्रमाणे वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी म्हटले की, ‘राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात.’ भिडे मास्तर रामाच्या प्रतिमेला जर मिशी चिटकवली तर त्याचा परशुराम तयार होतो हे समजण्याइतप बहुजन समाज जागृत झाला आहे, हे भिडेंनी समजून घेणं आवश्यक आहे पण त्यांना ते समजत नसेल अथवा न समजण्याचं ढोंग ते करत असतील हे तर महामाहीम परशुरामच जाणो. पण भिडेंना विचारावं वाटत की लोकांनी आजपर्यंत केवळ सितेचा राम पाहीला होता पण तुम्ही मिशीचा राम म्हणत असाल तर आमच्या घरातील लहान मुलंही ‘राम सितेचा की मिशीचा’ म्हणतं फिदीफिदी हासत आहेत.
कीकडे कोरोना षंढयत्र राबवून कोरोनाचा संसर्ग वाढवला जात आहे तर दुसरीकडे राम मंदीर भुमिपुजनाची लगबग पाहून असं वाटतं की, देशातील संघप्रणित भाजप सरकारचं काम म्हणजे कोरोनाच नाव वापरून केवळ राम मंदीर भुमिपूजन करो’ना’ (शिवस्मारक भुमिपूजन करो’ना’) असं आहे, रामभक्तांना सितेचा राम पाहीजे तर शिवप्रतिष्ठानच्या मनोहर कुलकर्णी यांना मात्र रामाला मिशी पाहीजे. तेव्हा म्हणावं वाटतं ‘कोणाचं काय अन् कोणाचं काय, मध्येच मनोहरांचा फाटक्यात पाय’.
राम मंदीर भूमिपुजनाचा सोहळा ०५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार होता, या संदर्भात शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. व त्यात ते म्हणाले की, ‘राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. अयोध्येतील मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना करताना सर्व पुरुष देवतांना पुरुषत्वाचे प्रतीक असलेल्या मिशा असाव्यात याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी,(संदर्भ मॅक्स महाराष्ट्र ०३ आॅगस्ट २०) तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे’. मग मनोहर कुलकर्णी यांना सांगावं वाटत की, ज्या बहूजन समाजाच्या घरात दोन वेळच्या जेवणाचे वांदे असताना त्यांनी घरात राममंदीराचा आनंदोत्सव साजरा करावा तरी कसा ?, आज बहूजन समाजातील शिकला सवरलेला उच्चशिक्षित जिवंत राम दोन वेळच्या जेवणाला मौताल तर झालाच आहे पण त्याचा भाऊ लक्षमण बंद पडलेल्या शाळामुळे शिक्षणापासून वंचित तर त्यांचा बाप दसरथही शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे झाडाला दोरखंडाने फास घेतोय मग आमचा बहुजनांचा जिवंत असलेला खरा राम जर येवढा दु:खात डुबलेला असेल तर त्याने अयोध्येतील दगडी रामासाठी व त्यांच्या निर्जीव मुर्तीसाठी काय म्हणून आनंद साजरा करावा ?.
पुढे भिडे सल्ले देताना म्हणतात की, मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी निमंत्रण नसले तरी अयोध्येत जावं. तेव्हा भिडेसह ठाकरे व शरद पवरांना सांगावं वाटत की, निमंत्रण नसताना किंवा असताना कोणी कुठे जावं अथवा न जावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण ठाकरे व पवारांनी कधी तरी प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे पुस्तकं वाचून मंदीराचे व रामाचं समर्थन करावं.
पुढे भिडे म्हणतात कीराम मंदिराचे पतन झाल्यानंतर सुमारे ५०० वर्षांनी आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. गाव, खेड्यात हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा. तसेच या सोहळ्यात आयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आगत्याने पूजन करावे. तेव्हा भिडेंना सांगावं वाटत की, कृष्णा कुलकर्णी या विकृतीचं धडावेगळे शिर करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि कोणताही गुन्हा नसताना शंबुकाची हत्या करणारा राम यांचा संबंध जोडणे हे योग्य ठरेल का ? म्हणून बहूजनातील तरुणांनी पेरियार रामास्वामी लिखित ‘रामायणातील सत्य’ हे पुस्तक वाचलं पाहिजे, कारण आमचा बहुजन समाजातील तरूण आता वाचणारा पाहीजे त्यांनी नाचणे आता बंद केले पाहीजे. कारण वाचणे चालू झाले की, छत्रपती शिवाजी महाराज व रामाचे एकत्रित पुजा करणे चुकीचे आहे हे समजेल. राम जर देवच असेल तर देवाच्या मंदीराचा न्याय न्यायालयात लागतो कसा ? म्हणजेच संविधानाच्या पुढे रामाचं चालत नसेल तर मग संविधान सर्वश्रेष्ठच समजावे लागेल. पण भिडेंसारख्यांना संविधान चालत नाही म्हणून तर असंविधानिक मार्गाचा वापर करून मंदीराची स्थापना होतेय हे कोणीही नाकारू शकत नाही.
कर्नाटकमधील भाजपच्या महिला खासदार शोभा कर्नाडलजे यांनी तर अकलेच्या सर्व मर्यादा पार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांना रामापेक्षाही मोठे ठरवले आहे. (संदर्भ मॅक्स महाराष्ट्र ०५ आॅगस्ट २०) काही दिवसांपूर्वीही अशाच काही विकृतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली होती. तेव्हा भिडेंना विचारावं वाटतं की, कर्नाडलजे यांनी रामाला नरेंद्र मोदीप्रमाणे मिशी नाही नाही म्हणून कमी लेखले असेल का ? त्यामुळे खासदार शोभा कर्नाडलजे व शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी यांना सांगावं वाटतं की, भलेही तुमचे नरेंद्र मोदी रामापेक्षा मोठे अथवा राम नरेंद्र मोदीपेक्षा श्रेष्ठ असेल; पण राम व नरेंद्र मोदी हे दोघेही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेपुढे लहानच आहेत येवढ मात्र नक्की. कारण रामाचं मंदीर तर मोदींचं प्रधानमंत्री पद हे संविधानाच्या चौकटीविना अशक्य आहे. म्हणूनच तर गाडगेबाबा म्हणाले असतील की, तुम्हाला देवच माणायचं असेल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना देव माना कारण त्यांनी या देशाला राज्यघटना दिली.
देशभरात (विनामिशीवाल्या) राम मंदीर भुमिपूजनाचा रामभक्तांकडून जल्लोष साजरा होत असताना मात्र धुळे जिल्ह्यातील (मिशीवाल्या) राम भक्तांनी चक्क तीन बोकड फक्त करून ‘मटनावर ताव मग जय श्रीराम‘ केलं. (महानगर न्यूज फोरम) तेही हिंदुचा पवित्र समजला जाणा-या श्रावण महीन्यात राम भक्तांनी नवीनच प्रताप केला; विशेष म्हणजे हे धुळे जिल्हा परिषद मध्ये भाजपची सत्ता असून हे रामभक्त भाजपचे जि.प.सदस्य होते. तेव्हा भिडेना विचारावं वाटत की, हेच का तुमच्या हिंदू धर्माचे रक्षक ?
आज पडलेल्या शाळांची अवस्था बिकट आहे ते बांधण्याचे काम सरकारकडून होत नाही आणि कोरोनामुळे सर्व शाळा महाविद्यालये बंद असल्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित  आहेत पण सरकारला केवळ चिंता आहे ती मंदीराची म्हणून तर शेवटी गाडगेबाबांच्या शब्दातच सांगावं वाटत की, शाळा पडू द्या, लेकरं मरू द्या पण … मंदीर बांधा बापहो … सोन्याचा कळस चढवा त्यावर, उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात …
बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर माणसाच्या जीवनात सुखसमृद्धी आणत असेल तर … विकणारा काय खुळा आहे का ? तो स्वत:चे भले करण्याऐवजी बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करील … हे कधी कळणार माझ्या बांधवांना … ?
Leave A Reply

Your email address will not be published.