कंधारचे तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते रुजू

0 80

कंधारचे तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते रुजू

 

कंधार (नितीन कोकाटे) : येथील तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख हे सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या जागेवर विठ्ठल भानुदास गित्ते हे तालुका कृषी अधिकारी म्हणून शुक्रवारी दि. १६ जून रोजी रुजू झाले आहेत.

कंधारचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर पेठवडजचे मंडळ कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. पुन्हा लोह्याचे तालुका कृषी अधिकारी एस. एन. पोट पेलवार यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. मात्र गेल्या २० महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त होते. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले होते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील भोकरचे तालुका कृषी अधिकारी विठ्ठल भानुदास गित्ते यांची कंधारचे तालुका जाते. कृषी अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे. विठ्ठल गित्ते यांनी शुक्रवारी दि. १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता तालुका कृषी अधिकारी म्हणून पदभार सहाय्यक स्वीकारला आहे. नव्याने रुजू झालेले विठ्ठल गित्ते यांचे स्वागत कंधार तालुका कृषी अधिकार याच्या वतीने करण्यात आले. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ मत व्यक्त केले. विठ्ठल गित्ते हे मूळचे कंधार तालुक्यातील बजारवाडीचे आहेत. अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ असे तालुका कृषी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले.

यावेळी सहाय्यक अधीक्षक उमाकांत काळे, वरिष्ठ लिपिक हनुमंत कल्याणपाड, अनुरेखक गोविंद बनसोडे, कृषी सौ. सुनीता पिंपळगावे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार, सेवक वैजनाथ नावंदे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.