कदम कुटुंबावरील प्राण घातक हल्ल्या प्रकरणी आरोपीवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करा

0 102

कदम कुटुंबावरील प्राण घातक हल्ल्या प्रकरणी आरोपीवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करा

आरोपीना पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षक व बीट अंमलदार यांना तात्काळ निलंबित करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

 

परळी (वार्ताहर) : तालुक्यातील मौजे नंदागौळ येथे कदम कुटुंबावर झालेला प्राणघातक हल्ला खूप भयानक असून यामध्ये कदम कुटुंबातील महादेव सुदाम कदम यांना डोक्यामध्ये 28 टाके, सोमनाथ मनोहर कदम यांना डोळ्यास गंभीर दुखापत व ओठावर 7 टाके व श्रीकृष्ण तुकाराम कदम यांना डोक्यात 16 टाके पडले असून या हल्ल्यामध्ये गरोदर महिला मयुरी नरहरी कदम यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून यांना जखमी केले आहे. दुसरी महिला लिंबाबाई कदम, नर्गिस महादेव कदम या महिलांना सुद्धा सदरील हल्ल्यामध्ये जबर मारहाण झाली. कदम कुटुंबियांच्या डोळ्यात मिरची (चटणी) टाकून हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात हल्लेखोर भास्कर रावण गीते, राहुल भास्कर गीते, गणेश शिवाजी गीते, अमोल भास्कर गीते यांना तात्काळ अटक करून गावातून तडीपार करण्यात यावे व या हल्ल्याप्रकरणी दोषी असणारे पोलीस निरीक्षक व बीट अंमलदार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने उपअधीक्षक अंबाजोगाई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.या प्रकरणी कारवाई करून कदम कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अन्यथा सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करील.असा इशारा याप्रसंगी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
संबंधित आरोपी आम्हास मारहाण करण्याच्या तयारीत असल्याची तक्रार 29 तारखेला कदम कुटुंबियांकडून दाखल केली होती. परंतु पोलीस प्रशासनाने संबंधित प्रकरनाकडे कानाडोळा केला. लेखी अर्जाद्वारे वारंवार मागणी केली होती की आमच्या जीविकास धोका असून आमचं संरक्षण करण्यात यावं पण पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने दखल घेतली असती तर हा प्राणघातक हल्ला झालाच नसता. या हल्ल्याला पोलीस निरीक्षक (इन्चार्ज) व बीटअंमलदार हे जबाबदार असून यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व आरोपींवर 307 कलम अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करून गावातून तडीपार करण्यात यावे.अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. सकल मराठा समाज पूर्णपणे कदम कुटुंबासोबत आहे असा विश्वास राजकीय पक्ष, संघटनेतील, डॉक्टर, शिक्षक,व्यापारी अशा विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी याप्रसंगी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.