आळंदीत वारक-यांना पोलिसांकडून मारहाण

0 3,695

आळंदीत वारक-यांना पोलिसांकडून मारहाण

 

पुणे (आळंदी ) : टाळ – मृदुंगाच्या निनादात नामदेव तुकाराम नावाचा जयघोष करत भगवे झेंडे घेऊन मोठ्या आनंदामध्ये वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी आळंदीमध्ये एकत्रित येतात. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार असल्याने त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे. मात्र या प्रस्थानावेळी वारकरी अन् पोलीस आमने सामने आल्याने पोलिसांकडून वारक-यांवरती लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. ही मानुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचेही बोलले जात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची जिम्मेदार घेऊन माफी मागावी अशी मागणी होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आज आळंदीतून माऊलींच्या पालखीचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र या प्रस्थानपुर्वीच आषाढी वारी सोहळ्याला प्रशासनाकडून गालबोट लावल्याचे दिसत आहे. या पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले त्यातून पोलिसांनी बळाचा वापर करत या वारकऱ्यांना मारहाण केल्याची माहीती मिळत आहे.

श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह देशातील वारकरी लाखोंच्या संख्येने आळंदित दाखल होतात. यामुळे आळंदीमधील इंद्रायणी घाट, सिध्दबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने आल्यामुळे गर्दी झाली आहे.
वारकऱ्यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी अशी मागणी सध्या होताना दिसत आहे. त्यात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासणारे संभाजी ब्रिगेडचे राजेश गुंड यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्यथा… आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात पाय ठेऊ देणार नाही..!’ असा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.