कर्नाटकातील हिजाब बंदी मागे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा

0 74

कर्नाटकातील हिजाब बंदी मागे
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा

बेंगळुरू : कर्नाटक सरकारने शुक्रवार रोजी हिजाब घालण्यावरील बंदी मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यात हिजाबवर बंदी नाही. यावर घातलेले निर्बंध लवकरच उठवले जातील, एक महिला तिला पाहिजे ते परिधान करू शकते असेही त्यांनी सांगितले़
यापुढे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, आता राज्यात हिजाबवर बंदी नाही. या निर्णयामुळे मुस्लिम महिला हिजाब घालून कुठेही जाऊ शकतात. हिजाब बंदीचे आदेश मागे घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगत त्यांनी तुम्ही काय घालता आणि काय खावे ही तुमची निवड आहे. मी तुला का थांबवू? असेही त्यांनी म्हटले़

Leave A Reply

Your email address will not be published.