जिल्हाध्यक्षाच्या घरात वेश्याव्यवसाय – पोलिसांच्या पथकाकडून जिल्हाध्यक्षांसह चार महिला आणि दोन पुरुषांना अटक

0 58

जिल्हाध्यक्षाच्या घरात वेश्याव्यवसाय
– पोलिसांच्या पथकाकडून जिल्हाध्यक्षांसह चार महिला आणि दोन पुरुषांना अटक
कासगंज : आरएलडी जिल्हाध्यक्षाच्या घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजल्यानंतर त्याचा पदार्फाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणावरून आरएलडी जिल्हाध्यक्षांसह यांच्यासह चार महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे. पोलिसांनी महिला व पुरुषांना पकडून महिला पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर निरीक्षण प्रभारींनी सर्वांविरुद्ध अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
शहरालगतच्या अहरौल गावात आरएलडीच्या जिल्हाध्यक्षा अश्मा वारीसी यांच्या घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुरुवार रोजी सायंकाळी पोलिसांच्या निगराणी पथकाचे प्रभारी प्रवेश राणा यांना मिळाल्यानंतर निरिक्षण प्रभारींनी वरिष्ठ अधिकाºयांना सांगितल्यावर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. मागील अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळत होती. याचा पर्दाफास करण्यासाठी निगराणी पथकाकडून त्यावर देखरेख ठेवण्यात येत होती़
सदरील प्रकरण वेश्याव्यवसायाशी संबंधित असल्याने एसओजीचे प्रभारी विनय शर्मा यांना त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी सरिता तोमर यांना सोबत घेतले. यानंतर महिला पोलिस स्टेशनचे संयुक्त पथक रात्री अहरौलीत पोहोचले आणि त्यांनी आरएलडी जिल्हाध्यक्षांच्या घराला घेराव घातला. यावेळी नायब तहसीलदार अरविंद गौतम हे न्यायदंडाधिकारी म्हणून हजर होते़ या पथकाने दरवाजा ठोठवल्यानंतर एका तरुणाने उघडताच पोलिसांना पाहून पळा, पळा म्हटल्याने धांदल उडाली़
रोख रक्कमेसह मोबाईल जप्त
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ४४ हजार रुपये, पाच मोबाईल फोन, कंडोमची तीन पाकिटे, सिगारेटचा बॉक्स आणि एक रिकामी बिअर जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या देखरेख कक्षाने हे रॅकेट शोधून काढले असल्याचे सांगितले जात आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.