पद्मश्री परत करण्याची घोषणा

0 28

पद्मश्री परत करण्याची घोषणा
नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. पुनियाने ट्विट करताना म्हटले की, मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे…. याबरोबर त्याने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ही घोषणा केली आहे. याआधी साक्षी मलिकने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली होती. बृजभूषण सिंग यांचे सम संजय सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष बनवल्याने ती नाराज होती. यावर्षी जानेवारी महिन्यात देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे प्रभारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. त्या महिला कुस्तीपटूंनी जेव्हा आंदोलन सुरू केले तेव्हा मी. देखील सामील झाले असे त्यांने मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.