धर्मग्रंथात जगण्याचे तंत्र ?

0 320
धर्मग्रंथात जगण्याचे तंत्र ?

 

 

✍️ रेपे नवनाथ दत्तात्रय
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
 मो. 9762636662

 

धर्म ग्रंथांचा गांजा पाजला की, धर्माची नशा चढते हे वारंवार सिध्द होत आहे. हा धर्म ग्रंथांचा गांजा विक्री करण्यात जे खरे पटाईत आहेत ते म्हणजे संघी मनुवादी व त्यांचे बहुजन समाजातील लाळचाट्ये राजकीय पुढारी. उदाहरण द्यायच झाल तर गुजरात सरकारने एखादा धर्मांध विषय घेतला की त्याला विरोध न करता षंढाची भूमिका घेणारे त्या विधानसभेतील बहुजन समाजातील मनुवाद्याचे लाळचाट्ये नसतील का ?एकीकडे मनुवादी व्यवस्था आपल प्रस्थ मजबूत करून धर्माचा नशा पाजत असताना त्यांचेच नेते अच्छे दिन आल्याच भासवून जनतेला धर्माच्या चिखलात ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात त्यात भाजपचे नेते अतुल भातखाळकर हे त्यांच्या ट्वीटवर म्हणतात की, धर्म ही अफूची गोळी आहे, असं म्हणणा-या लाल माकडांना चक्क देव मस्तकी धरावासा वाटतो आहे. हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटणारे मंदीराच्या दारी जातात. नरेंद्र मोदी यांच्या राज्यात खरच अच्छे दिन आलेत !अस म्हणतात त्या धर्मांच्या माकडांना विचाराव वाटत की, कुठे आहेत तुमचे अच्छे दिन ?जिकडे नजर जाईल तिकडे शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई तसेच शालेय अभ्यासक्रमात धार्मिक ग्रंथाचा समावेश करून शिक्षण क्षेत्राचा बट्याबोळ होताना दिसत आहे याला अच्छे दिन म्हणतात का धर्मांध माकडांनो ? पण धर्मांध माकडांच्या गळ्यातील ताईत होऊन बसलेल्या अतुल भातखाळकर यांना काय घंटा समजणार अच्छे दिन ?कशाला म्हणतात. कारण नरेंद्र मोदी या देशाचे मदारी तर अतुल भातखाळकर हे या देशात चालणा-या धर्माध सर्कशीतले एक माकड ?आहेत, असे म्हटल तर चालेल कारण ते इतरांना माकड म्हणत आहेत. पण या माकडांना वाटत की, धर्मग्रंथ हेच सामान्यांच्या जगण्याचे तंत्र आहज पण ही त्यांनी केलेली समाजाची दिशाभूल असून ती एक अफवा आहे.
गुजरात सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात काही घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलांना श्रीमद्भगवद् गीताचे तत्त्वे आणि मूल्ये शिकवली जाणार आहेत.
शालेय मुलांना गीता आणि त्यातील मूल्यांची माहिती व्हावी, यासाठी प्रार्थना, श्लोक, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील श्रीमद्भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होणार असताना गुजरात सरकारने शाळांमध्ये श्रीमद्भगवद् गीता शिकवण्याची घोषणा केली आहे. सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमांमध्ये श्रीमद्भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात श्रीमद्भगवद् गीता समाविष्ट करण्यात येणार आहे. (साम टीव्ही १८ मार्च २२) तेव्हा प्रश्न पडतो की, भगवद् गीता शालेय अभ्यासक्रमात घुसडून गुजरात सरकार काय साध्य करू पाहत आहे ?विद्यार्थांना गीतेचे श्लोक शिकवण्यापेक्षा त्यांना थेट कुंभमेळ्यातच समाविष्ट करा कारण शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता समाविष्ट करून जे साध्य होणार आहे ते कुंभमेळ्यात विद्यार्थांना समाविष्ट करून होणार नाही का ?.
फेब्रुवारी २०२२ मध्ये दिल्ली महानगरपालिकेने आपल्या शाळेत भगवद् गीता समाविष्ठ करण्याची तयारी दाखवली आहे. कारण दिल्लीचे महापौर मुकेश सुर्यान म्हणतात की, आम्ही प्राथमिक शाळांमध्येही गीता शिकवू, ज्यामुळे विद्यार्थांच व्यतिमत्व घडण्यास मदत होईल. तसेच हारियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये कुरूक्षेत्र येथे सुरू असलेल्या आंतराष्ट्रीय गीता महोत्सवात घोषणा करताना म्हणाले की, शाळांमध्ये गीतेचे श्लोक शिकवले जातील. तरुणांनी जर गीतेचे श्लोक आत्मसात केले तर जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेशे आहे. तर शाळांमध्ये ‘नैतिक शास्ञाचा भाग’ म्हणत गीतेचा अभ्यास अनिवार्य करावा की नाही, हा विचार सुरू आहे अस मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान म्हणाले. (बोल भिडू १८ मार्च २२) तेव्हा सागावं वाटत की, गीतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थांच व्यक्तिमत्व घडण्यास मदत होईल ही शुध्द अफवा आहे. कारण आसाराम, रामरहीम, नारायण साई, निर्मल बाबा, स्वामी नित्यानंद, स्वामी भिमानंद व बाबा रामपाल हे सर्व अध्यात्म व धार्मिक ग्रंथावर आभाळ हेपलत होते पण त्यांनी त्या ग्रंथातून काय शिकले ?ते जिवणात कसे यशस्वी झाले ?हे जेलच्या गजाआडून सर्व दिसत आहे. त्यामुळे कोणतातरी धार्मिक ग्रंथ तुम्हाला याशाच्या शिखरापर्यत घेऊन जाईल हे सर्व थोतांड आहे. म्हणून तर प्रदूषित महाभारत या पुस्तकात भगवद् गीतेमध्येही प्रदूषण या प्रकरणात श्रीकांत शेट्ये लिहतात की, एकदा निष्काम कर्मयोगाचा उपदेश तर दुस-यांदा सकाम कर्मयोगाची तरफदारी. महान धर्मग्रंथ म्हणून मानण्यात आलेल्या गीतेमधील हे वैचारिक प्रदुषण !धर्मरक्षणाच्या नावाखाली ब्राम्हणी वर्चस्वाचे रक्षण करण्याचा हा डाव आहे, हे बहुजन समाजाच्या लक्षात येत नाही. परकीय भूमीतून या देशात आलेल्या युरेशियन भटांनी इथल्या मुलनिवासी लोकांवर वर्चस्व गाजविण्यासाठी ‘देव व अध्यात्म’ यांचा वापर केला. देवता प्रसन्न करून घेण्याची विद्या फक्त ब्राम्हणांनाच अवगत असते हे लोकांना पटावे म्हणून भटा-भिक्षुकांनी यज्ञ-याग केल्यामुळे निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती कशी झाली, ब्राम्हणांनी यज्ञ-याग केल्यामुळे क्षुल्लक राजाचा चक्रवर्ती राजा कसा झाला, मेलेली माणसे ब्राम्हणी कर्मकांडामुळे जिवंत कशी झाली, कुणाचे असाध्य रोग कसे बरे झाले. अस सांगणा-या बनावट कथा रचल्या. त्या कथांचे संग्रह म्हणजेच रामायण – महाभारत ही महाकाव्ये व तीस चाळीस महापुराणे व उपपुराणे.
गुजरात राज्याचे शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी जो शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश केला तो राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांना लागू असून तो शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून समाविष्ठ असेल अस समजत. महाराष्ट्रातही शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीता समाविष्ठ करावी अशी कारण भगवद् गीता हे जगण्याचं सुत्र आहे, याचा समावेश केल्यास येणारी पिढी संस्कारक्षम होईल त्यामुळे भगवत गीतेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा अस भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले म्हणाले. तसेच दुसरीकडे कर्नाकटचे राज्य शिक्षणमंत्री बी.सी. नागेश म्हणाले की, भगवद् गीता ही केवळ हिंदुसाठी नाही, ती सर्वासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, ते शाळेत शिकवलेच पाहीजे. पहील्यांदा ठरवावे लागेल की, आपल्याला शाळेत नौतिक शिक्षण पुन्हा करायचे की नाही. ज्याचा मुलांवर चांगला प्रभाव पडतो , ते शिकवायला सुरूवात केली जाऊ शकते, मग भगवद् गीता असो, रामायण असो किंवा महाभारत असो. (लोकमत १९ मार्च २२) धर्म धर्म करुन तडफणा-या स्वयंघोषित आचार्य याची खुजली थंड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले व प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहलेले साहीत्य शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. कारण महात्मा फुले व प्रबोधनकार ठाकरे यांचे साहीत्या या मनुवादी व्यवस्थेवर सफट मलम सारखे काम करते. कारण आचार्य भोसलेच ऐकूण या पुरोगामी महाराष्ट्राचा मनुवादी महाराष्ट्र करू नये. जर रामायण महाभारत व इतर धार्मिक ग्रंथ शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करायचे असतील तर कोणत्याही राज्य सरकाच्यात धमक असेल तर केवळ पेरियार रामासामी लिखित रामायणातील सत्य हे पुस्तक रामायणाया सोबत त्याचाही समावेश करावा किंवा नागरिकांना हक्क, अधिकार व कामाच्या बदल्यात मोबदला देणारे संविधान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करा मग खरी मजा येईल. पण हे षंढ राजकारणी असे धर्मग्रंथ शालेय अभ्यासक्रात समाविष्ट करतात की, ज्यात केवळ कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका असा उपदेश केला आहे. मग सांगा कोण आहे जो फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करायला तयार आहे ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
कृष्ण म्हणे भक्तांनो ढोरकाम करा ।
माझे पाय धरा दामासाठी ॥१॥
जैसे की गाढव उकिर्डे चरते ।
आशा न करते फळाची ते ॥२॥
मोबदला घ्यावा कामाचा टाचून ।
सांगे संविधान हक्क आहे ॥३॥
भग्वदगीतेची ही आहे कूट नीती ।
मुंडी भटाहाती देण्यासाठी ॥४॥
गुजरात सरकारने भगवद् गीतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला त्यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणतात की, भारताच्या संविधानातील कलम २८ नूसार, धार्मिक शिक्षण संस्था व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी धार्मिक शिक्षण अनिवार्य करता येणार नाही. नाहीतर मग त्यांना सगळ्या शाळांमध्ये एक धडा कुराणचा, एक धडा बायबलचा व एक धडा गीतेचा ठेवावा लागेल. सर्वांगी शिक्षण अशा नावाने जरी शिकवायच असेल तर मग त्यात सगळ्या धर्माचा समावेश करावा लागेल. एका विशिष्ट धर्माचा करता येणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले की, धर्म हा जगण्याचा भाग आहे, तो वागणुकीत असला पाहीजे. तेव्हा गुजरात सरकारने घेतलेला हा निर्णय कायदेशीररित्या आणि संविधानानुसार पुर्णतः चूक ठरतो. हा निर्णय केवळ वर्षाअखेर होणा-या निवडुकांकडे बघून घेतला आहे. (बोल भिडू १७ मार्च २२) ज्या राज्य सरकार व त्यांच्या लोकप्रतिनिधींना धर्मिक शिक्षणाची खाज सुटली आहे त्यांनी आपल्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमात संविधान व त्याचा कलमांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा पण हे लोकप्रतिनिधी तसे करणार नाहीत कारण सर्व सामान्य घरातील मुलांना जर शाळेतून दिल्या जाणा-या शिक्षणातून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार समजले तर ते लोकप्रतिनिधींना सोडणार नाहीत हे या लाळचाट्यांना माहीत आहे. म्हणून हे लोक धर्म ग्रंथांचा शिक्षणात समावेश होत असताना षंढत्वाची भुमिका घेऊन थंड होतात कारण त्यांना माहीत आहे की, आपण जर आज थंड नाही बसलो तर उद्या लोक आपल्याला थंड करतील.
त्यामुळे बहुजन समाजातील तरुणांना सांगाव वाटत की, तुम्ही बुध्द, तुकोबा, शिव, फुले, शाहु, आंबेडकर, पेरियार व आण्णाभाऊ यांनी लिहलेले साहीत्य वाचा कारण धार्मिक ग्रंथ वाचून वेळ वायफळ घालण्यापेक्षा तुम्ही संविधान वाचा. आजपर्यंत एकाही धर्मग्रंथान किंवा धर्माच्या ठेकेदारानं तुम्हाला जगण्याचा मंत्र तुमच्या हक्क अधिकाराच तंत्र दिल नाही. हे धर्मग्रंथ म्हणजे केवळ धर्माची नशा चढवण्याच्या लायकीचे आहेत ?त्यांची पुजा केल्याने अथवा त्यांचा जयजयकार अथवा इतरांच्या माथी मारून कोणाचही भल होणार नाही. कारण हे ग्रंथ पुजल्याने कोणाच भल झाल आहे ?जर भल झाल असत तर मंदीरात मुर्तीसमोर बलात्कार झाले नसते. त्यामुळे जगण्याचा मंत्र आणि हक्क अधिकारच तंत्र केवळ भारतीय राज्यघटनेत आहे. पण मनुवादी व्यवस्था तुम्हाला जगण्याचे तंत्र केवळ धर्मग्रंथात आहे अस भासवून त्याचच मंत्र गुणगुणायला लावतात. धर्मग्रंथ कोणीतरी देवाने लिहला अस सांगतात पण ही केवळ आणि केवळ अफवा आहे. या अफवेला जो बळी पडेल त्यांच कुटुंब बरर्बाद झालेल असेल कारण महात्मा फुलेंनी सांगितले आहे की, कोणताही ग्रंथ इश्वराने लिहला नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र।
परी धम्म चक्र बुध्दाहाती॥१॥
सुदर्शनाने का सु-दर्शन दिले।
माणसां कापिले चरा चरा॥२॥
अर्जुना स्वजन माराया लावतो।
अंगुलीमाल तो शस्र त्यागी॥३॥
भगवद् गीता सांगे करा रक्तपात।
सांगे तथागत युध्द नको ॥४॥
बुद्ध आहे माझा तार्किकांचा तर्क।
आंधळ्याचा नर्क देव आहे॥५॥
सत्य असत्याशी मन केले ग्याही, मणियलें नाही बहुमता 
– तुकोबाराय  
(सदरील लेख बामसेफचे मुखपृष्ठ दैनिक मूलनिवासी नायक मध्ये ३० आक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित झालेला आहे.)
Leave A Reply

Your email address will not be published.