बारावी परीक्षेत मागील वर्षाच्या तुलनेत २.१२ टक्क्यांनी वाढ -उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन व श्रेणी/ गुणसुधारणेसाठी अर्ज करता येणार

0 126

बारावी परीक्षेत मागील वर्षाच्या तुलनेत २.१२ टक्क्यांनी वाढ
-उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन व श्रेणी/ गुणसुधारणेसाठी अर्ज करता येणार

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात झाला असून, यंदा ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यंदाच्या निकालाची टक्केवारी ९३.३७ एवढी आहे. तर मागील वर्षाच्या तुलने या टक्केवारीत २.१२ टक्कयांनी वाढ झाली आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असून यासाठी गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी किंवा श्रेणी / गुणसुधारणेसाठी अर्ज करवा लागणार आहे.

मुरुडमध्ये बोगस क्लासेसचा धुमाकूळ…! – कोचिंग क्लासेस जोमात, मात्र पालक आहेत कोमात..!

नेपाळ सरकारकडून एमडीएच व एव्हरेस्ट मसाला विक्रीवर बंदी – मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन आॅक्साईडची शक्यता वर्तवण्यात आल्याने निर्णय

यावर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेस पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. यातील १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यंदाच्या निकालाची टक्केवारी ९३.३७ एवढी आहे. तर मागील वर्षाच्या तुलने या टक्केवारीत २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता – जागतिक स्तरावरील रक्तदाबाच्या वाढीमुळे वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशकडून चिंता व्यक्त

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला न्यायालयाचा झटका – २०१० नंतर दिलेली राज्यातील सुमारे पाच लाख ओबीसी प्रमाणपत्रे उच्च न्यायालयाकडून रद्द
बोर्डाच्या परीक्षेसेचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रती, पुनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे आॅनलाईन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in अधिकृत संकेत स्थळावरून स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित मंडळाकडे संपर्क साधावा.

कोवॅक्सिनच्या दुष्परिणामानंतर आयसीएमआरची बनारस हिंदू युनिव्हर्सिटीस नोटीस – लसीचे दुष्परिणाम आढळून आल्याचा दावा दिशाभूल करणारा आयसीएमआरचे मत

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष
उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ०५ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत
गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक २२ मे २०२४ ते बुधवार ०५ जून २०२४ पर्यंत अर्ज आॅनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच आॅनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / यूपीआय / नेट बँकींगद्वारे भरता येईल.
श्रेणी / गुणसुधारणा योजना उपलब्ध
फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी म्हणजेच, जुलै-आॅगस्ट २०२४ ते फेब्रुवारी-मार्च २०२५ श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
जुलै-आॅगस्ट २०२४ मध्ये मध्ये आयोजित करण्यात येणाºया पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी सोमवार २७ मे २०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.