उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता – जागतिक स्तरावरील रक्तदाबाच्या वाढीमुळे वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशकडून चिंता व्यक्त

0 108

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
– जागतिक स्तरावरील रक्तदाबाच्या वाढीमुळे वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर रक्तदाबाच्या समस्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते, हृदयविकारांमध्ये हा एक प्रमुख घटक मानला जातो. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने जाहिर केलेल्या एका अहवालात दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात उच्च रक्तदाबाने प्रभावित लोकांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अहवालानुसार, सुमारे २९४ दशलक्ष (२९.४ कोटी) लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. उच्च रक्तदाबामुळे गंभीर हृदयविकाराचा भार वाढू शकतो, त्यामुळे त्यावर ताबडतोब नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्नांनी सांगितले.

झरीकरांनी घेतला हार्ट अटॅकचा धसका – उपाययोजना करण्याची वैद्यकीय अधिकाºयांकडे मागणी

कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा
उच्च रक्तदाब हा असंसर्गजन्य रोगांचा प्रमुख घटक आहे. दक्षिण-पूर्व आशियासाठी डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक सायमा वाजेद यांनी शुक्रवारी सांगितले की, असा अंदाज आहे की दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशात उच्च रक्तदाबाची समस्या वेगाने वाढत आहे. जागतिक आणि राष्ट्रीय आरोग्य उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी उच्च रक्तदाब प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रयत्नांना बळकट करणे आवश्यक आहे. या आजाराची वाढती प्रकरणे भविष्यासाठी गंभीर धोके दर्शवतात.

सिंगापूरमध्ये कोरोना संक्रमणाच्या संख्येत ९० टक्क्यांची वाढ – भारतात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये संक्रमित लोकांची संख्या सर्वाधिक

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा
ब्लड प्रेशर आणि त्यामुळे निर्माण होणाºया धोक्यांबद्दल लोकांना सजग करण्यासाठी तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, ​​त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घकाळ जगा ही यावर्षीची थीम ठेवण्यात आली आहे. डब्ल्यूएचओने उच्च रक्तदाबाचा वाढता धोका टाळण्यासाठी मीठ, तंबाखू आणि अल्कोहोलचे जास्त सेवन टाळण्याचे आवाहन केले आहे. अस्वास्थ्यकर आहार आणि शारीरिक निष्क्रियता सोबत, तणाव आणि वायू प्रदूषण हे त्याचे मुख्य जोखीम घटक आहेत, ज्यासाठी सर्व लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष

हे ईश्वर….. आपण शरीरात लस घेतली हे आपल दुर्देव – बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रीयेमुळे मोठी खळबळ
डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक सायमा म्हणतात, रक्तदाबाच्या समस्या लवकर ओळखणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब असलेल्या निम्म्या प्रौढांना ही स्थिती आहे हे माहीत नसते. अशा स्थितीत रक्तदाबामुळे शरीराचे सतत नुकसान होत असते. आकडेवारीवरून असे दिसून येते की सहापैकी एका व्यक्तीचा रक्तदाब नियंत्रणात नाही. अनियंत्रित रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो ज्यामुळे अकाली मृत्यूचा धोकाही वाढू शकतो.

लोकांच्या शरीरात गेलेली धोकादायक लस परत कशी घेणार? – देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकल्याचा अखिलेश यांचा आरोप

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा
उच्च रक्तदाबाच्या वाढत्या जोखमींबाबत, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, उच्च रक्तदाबासाठी परवडणाºया आरोग्य सेवांपर्यंत लोकांचा प्रवेश अत्यंत मर्यादित आहे, ज्यामुळे रुग्णांना वेळेवर निदान आणि उपचार मिळू शकत नाहीत. हृदयविकाराच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी रक्तदाब नियंत्रित करण्याचे प्रयत्न सर्वात महत्त्वाचे आहेत. जीवनशैली आणि आहारातील बदलांच्या मदतीने रक्तदाब आणि संबंधित आरोग्य समस्यांचा धोका टाळता येतो.

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या – न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली
अनियंत्रित रक्तदाबाच्या समस्या
अनियंत्रित रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो ज्यामुळे अकाली मृत्यूचा धोकाही वाढू शकतो, असा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे.
रक्तदाब मोजा यावर्षीची नवी थीम
ब्लड प्रेशर आणि त्यामुळे निर्माण होणाºया धोक्यांबद्दल लोकांना सजग करण्यासाठी तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, ​​त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घकाळ जगा ही डब्ल्यूएचओकडून यावर्षीची थीम ठेवण्यात आली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.