आमच्या गावात पैसे आणि दारू पुरवठा चालणार नाही म्हणत पुढाºयांना ठणकावणारे गाव -निंलगा तालुक्यातील आनंदवाडीकरांच्या धाडसाची महाराष्ट्रभर जोरदार चर्चा

0 57

आमच्या गावात पैसे आणि दारू पुरवठा चालणार नाही म्हणत पुढाºयांना ठणकावणारे गाव
-निंलगा तालुक्यातील आनंदवाडीकरांच्या धाडसाची महाराष्ट्रभर जोरदार चर्चा

लातूर : निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून निवडणूकीच्या आदल्या रात्री पैसा आणि दारूच्या बाटल्याचे वाटप केले जाते. पण जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी या गावाने राजकीय पुढाºयांना सांगितले, आमच्या गावात पैसे वाटू नका, दारू पुरवठा तर चालणारच नाही. त्यामुळे या गावात एकही पुढारी पैसे वाटण्याचे धाडस करू शकला नाही. या गावातील मतदारांच्या या निर्णयामुळे गावच्या नावाची आणि त्यांच्या धाडसाची जोरदार चर्चा सुरू आहे.
आनंदवाडीमध्ये ग्रामपंचयातीच्या तीन टर्म बिनविरोध झाल्या आहेत. या गावची सत्ता महिलांच्या हाती असून खुल्या प्रवर्गात सरपंच निवडण्याची मूभा असतानाही सध्या वर्षा विष्णू चामे यांना साºयांनी बिनविरोध निवडले आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्याही आमिषाला बळी न पडता पैसे वाटप होण्यापूर्वीच राजकीय पुढाºयांना इशारा देणारे गाव म्हणून आनंदवाडीची सध्या मराठवाड्यात चर्चा आहे. या गावात ११२ घरे आहेत. गावातील प्रत्येक घराची मालकी महिलेकडे असून त्यांच्या सर्व मालमत्तेच्या नोंदी या महिलांच्या नावे आहेत. गावातील शेतीमध्ये महिलांचा ५० टक्के वाटा असल्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय शेतीचे कोणतेही व्यवहार होत नाहीत हे या गावचे विशेष आहे.
आनंदवाडी या गावात भंडाºयाची पंगत बसते तेव्हा जेवणासाठी पहिला मान महिलांना मिळतो. महिला जेवण करीत असताना गावातील पुरुष त्यांना जेवायला वाढतात. महिलांची पंगत उठल्यानंतर पुरुषाची पंगत बसते. अशा वेगवेगळ्या उपक्रमाची प्रत्यक्ष कृती करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी माजी सरपंच ज्ञानोबा चामे हे नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांना माऊली म्हटले जाते. गावातील प्रत्येक निर्णय लोकसहभागी होतो, त्यामुळे अनेक उपक्रम राबवता येत असल्याचे चामे सांगतात.
मुलींच्या लग्नांचा खर्च गावकरी करतात
गावात सोयरिक करायची असेल तर हुंडा देता-घेता येणार नाही. गावातील गरीब घरातील मुलींच्या लग्नाचा प्रश्न गावकरी चर्चा करून सोडवतात. ग्रामपंचायत गावातील एक मंदिराच्या मालकीचे दुकानास भाडे आकारत नाही. त्याबदल्यात गावातील मुलींच्या लग्नाचा मंडप मंडपवाला मोफत मारून देतो. गावकरी पलंग, गादीपासून ते भांड्या- कुंड्याचे रुखवत मुलीला देतात. दीड-दोन लाखांचा खर्च सारे जण मिळून उचलतात.
मतदान विकत घेता येणार नाही
गावात प्रचारासाठी पैसे आणि दारू देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आणि विशेष म्हणजे पुढाºयांनीही ते पाळल्याचे चामे सांगतात. फारच पैसे द्यायचचे असतील तर गावाच्या सार्वजनिक कामासाठी द्या, असे सांगण्यात आले. पण मतदान विकत घेता येणार नाही, असे गावकºयांनी पुढाºयांना ठणकावून सांगितले. गावाचा एकोपा टिकावा म्हणून अनेक उपक्रम सुरू असतात त्यातूनच या गावाने निवडणुकीमध्ये मतदानासाठी पैसे देऊ नका, असे पुढाºयांना सांगितल्याने विविध विकास चळवळीत काम करणाºया गावांमध्ये सध्या आनंदवाडीची चर्चा सुरू आहे.
विधवांना हळदीकुंकवाचा मान
आनंदवाडी गावातून पूर्वी विधवांना हळदीकुंकू आणि वाण लूटण्याचा मान मिळवून देण्यात आला होता. आता गावातील स्मशानभूमीला मसनवाटा असे कोणी म्हणत नाही. जे आईवडील प्रगतीसाठी झटतात ते मृत्यूनंतर अहीत कसे चिंततील, असा विचार रुजविण्यात आला आहे. स्मशानभूमीमध्ये आता व्यायामशाळा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.