केकाणवाडीत ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोप कार्यक्रम संपन्न

0 228

केकाणवाडीत ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोप कार्यक्रम संपन्न

 

अंजनडोह (प्रतिनिधी): केज तालुक्यातील केकाणवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’, ‘मेरी माटी मेरा देश’, ‘शिला फलक अनावरण’, ‘वसुधा वंदन’या अभियाना अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट रोजी गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या प्रभातफेरीत पोषक आहार, बालविवाह प्रतिबंधक कायदा, शैक्षणिक व देशभक्तीपर घोषणा वातावरण निर्मिती करण्यात आली.
१५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण केज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा केकाणवाडी ग्रामपंचायतीचे प्रशासक अनिल चवरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करण्याचा मुख्य उद्देश असुन जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील थोर क्रांतिकारकांनी घडलेल्या पराक्रमाची आठवण व्हावी, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, याकरिता देशाच्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगुन, कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
ध्वजवंदना नंतर शहीद जवान गोविंद चाटे यांच्या शिला लेख फलकाचे अनावरण त्यांचे आई-वडील रामदास चाटे व गवळणबाई चाटे यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना ‘वसुंधा वंदन’ ची शपथ अनिल चवरे यांनी दिली. ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमा अंतर्गत सर्व उपस्थितांनी मुठ-मुठ माती एकत्र जमा करून शपथ घेतली.
वृक्षारोपण व संवर्धन या उपक्रमा अंतर्गत विस्तार अधिकारी अनिल चवरे, ग्रामसेविका मिना कांबळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रवींद्र चाटे, उपाध्यक्ष गणेश केकाण, मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन, शिक्षिका तरमिन बानू पठाण व अनिता गायकवाड यांनी पिंपळ, चिंच, पिंपर्णी, नांदुरकी व बेल इत्यादी देशी वृक्ष व लोखंडी जाळी देऊन वृक्ष संवर्धनाची जवाबदारी घेतली. शाळेच्या नवीन जागेत वृषारोपन करण्यात आले.
या कार्यक्रमा साठी माजी सरपंच बबिताताई केकाण, बालासाहेब केकाण,चेअरमन सिमाताई केकाण, मुकुंद केकाण, सुरेश केकाण, जनार्धन केकाण, संतोष केकाण, दिनकर केका ण,श्रीराम केकाण,महादेव केकाण, तुकाराम चाटे,ज्ञानोबा पाटील,तरमिन बानू पठाण,अनिता गायकवाड, वर्षाताई चाटे,संजीवनीताई केकाण,शकुंतला चाटे ईत्यादीसह गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगद केकाण, अंकुश केकाण,मुरलीधर चाटे ईत्यादीसह सर्वांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.