गुगळीचे चक्रपाणी बाबा : अंदाज देतात येड्यावाणी

मान्सूनची दिंडी निघतेय आणि ती केवळ तुम्हाला दिसतेय हे नवलच नाही का ? यावर्षी दिंडी नियोजित मार्गाने न येता ती दिंडी गोव्यावरून तिकडे उत्तरप्रदेश हरियाणात गेली का काय हो डक साहेब ? ती मान्सूनची दिंडी, चक्रीवादळाचे पंख आणि त्याचा डोळा तुमच्या भक्तांच्या तरी शेतात मुक्कामी बोलवा. तुमचे भक्त तुमच्यासाठी सोशल मिडीयावर अवैज्ञानिक व अवैचारिक लढाई लढत आहेत. या तुमच्या भक्तांना दिंडीयोध्दा म्हणाव की चिंधीयोध्दा ? एवढं तरी ३:३० च चित्र उल्ट करून सांगा.

1 1,095

गुगळीचे चक्रपाणी बाबा : अंदाज देतात येड्यावाणी

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे

“भट बोकड मोठा” या पुस्तकाचे लेखक

 

माझे प्रश्न आणि संघर्ष थेट त्यांच्याशी चालू आहे, जो ३:३० च्या “चिठ्ठ्या” बघून हार्प षढयंत्राला “मिठ्या” मारतो !
यात बडव्यांनी व भडव्यांनी मध्ये पडू नये !

आमच्या शेतकऱ्यांच्या पुढे जर कोणी मी शेतकऱ्यांचा पोरगा, रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करतोय असं कोण ओरडला तर हाच साधाभोळा काळ्या मातीवर निस्वार्थ प्रेम करणारा शेतकरी त्याला आपल म्हणून गोंजारतो. शेतकऱ्यांच्या याच साधेपणाचा गैरफायदा घेऊन आज काही भडवे राजकारणी आणि दलाल पोटभरू कैवारी शेतकऱ्यांना नागवण्याचं नासवण्याच आणि जिरवण्याचं काम राजरोजपणे करताना दिसतात, तरीही आमचा उच्चशिक्षित तरुण तोंडावर बोट ठेऊन शांत बसलेला दिसतो. यामुळे तर शेतक-यांना वाटणारा त्यांचा कैवारी त्यांच्या मानगुटीवर बसतो. तेव्हा आमच्या सारख्यांना हातात पेन घेऊन या बहुरुपी कैवा-यांच्या आणि झोपलेल्या तरुणांच्या पृष्ठभागावर डागण्या द्याव्या लागतात. या तर्काच्या डागण्या टोचू लागल्या बोचू लागल्या की, या बहुरुपी भडव्यांच्या पायाच्या अंगठ्यांचा लाॅलीपाॅप चाखणा-या आमच्यातील भडव्यांचा तिळपापड होतो. पण या नालायकांना गुमावतो कोण ? यांच्यात खरंच जर धमक असेल तर यांनी तर्काच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन दाखवावीत, अन्यथा तुमचा देवरूपी साहेब दादा आणि पादा दलाल भडवा आहे ! असा आम्ही खुला प्रचार आणि प्रसार करु !

दम्यावाली म्हतारी दवाखान्यात आडमीट करा आणि अवघ्या तीन तासांत गावात पावसाचा धुमाकूळ करा !

हवामान खाते म्हणजे नेभळटांचा बाजार म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. यांनी दिलेले आजपर्यंतचे अंदाज किती आणि कधी खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय होतो. मागील पाच सहा वर्षांपुर्वी पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवल्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थोड्याशा पावसावर पेरण्या केल्या. पण नंतर पावसाने जी सुट्टी मारली ती कायमची. यामुळे शेतकरी देशोधडीला गेला हा इतिहास आहे, हा कोणीही नाकारू शकत नाही. बीड जिल्ह्यातील शेतकरी ह्या हवामान विभागाने मातीत घातला त्याला माजलगाव मतदार संघातील तेव्हाचे धडाडीचे शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकरी कृती समितीच्या वतीने पुणे वेधशाळेला कूलूप ठोकले होते. हवामान खात्याकडे अनेक यंत्र सामग्री असताना जर त्यांचे अंदाज जर चुकीचे ठरत असतील तर मग किड्या मुंग्या, कावळे सरडे यांच्या तोंडाकडे बघून किंवा विमान रेल्वे आणि मंदीरातील घंट्यांचे आवाज ऐकून पावसाचे अंदाज खरे ठरतील कसे ? हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे. पण आंब्यांच्या रसाचे घोट प्राशन करून आणि चिंचाचे बोटूक तोंडात धरून मंदीरातील घंट्यांचे आवाज ऐकत एक महाशय उभ्या महाराष्ट्रात पावसाचे अंदाज सांगून गडगंज संपत्ती गोळा करताना दिसतात, पण याकडे कोणाच लक्ष आहे ? ते चुकीचे हवामान अंदाज सांगून कंपन्यांची दलाली करून पैसा मिळवतात असा आरोप या महाशयांवर नाशिक मधील एका बागायत दाराने केला आहे. पण ज्यांच्या बुद्धीला गंज चढला आहे, त्यांना नाशिकच्या शेतकऱ्याने लावलेल्या आरोपांवर विचार करण्यापेक्षा त्याला शिव्या देण्यातच भक्तांचा थवा पुढे सरसावत असेल तर मग या महाशयांच्या वाटेला जाईल कोण ? म्हणून तर लोक खोट्या अंदाजांचा बुक्कीरुपी मार सहन करताना दिसतात. पण ‘त्यांच्याच वाटेत जाऊन त्यांचीच वाटमारी केल्याशिवाय….. आमच्या वाटेवर परतत नाही’ (एका ठिकाणी या महाशयांचा ठरलेला नियोजित कार्यक्रम ठरला होता, मात्र संयोजकांनी फेसबुकवर विचारलेले तार्किक वाचून त्यांच्या मनातही प्रश्न निर्माण झाल्याने सरड्यांचे लाल तोंड बघणा-या महाशयांचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला.) हा इतिहास ज्यांना माहीत आहे. ते या ‘पंजाब’ हरियाणावाल्या बाबाला आणि त्याच्या तर्कहीन व विज्ञानहीन अंदाजाला कोलतात आणि त्यांना सोलतात सुद्धा हे वास्तव आहे. म्हणून या बाबाला आणि त्यांच्या अंदाजाला आम्ही ‘गुगळीचे चक्रपाणी बाबा : अंदाज देतात येड्यावाणी’ असेच म्हणतो.

यावर्षी तुम्ही गावरान आंब्यांचा रस जास्त खाल्ला म्हणून पाऊस नाही असं गुगळीचे ह.भ.प. पंजाबशास्त्री गुगळीकर कट्याववरच्या किर्तनात म्हटले आहेत !

मागील महीन्यात दि. ०८ जुलै रोजी वर्तमानपत्राच्या कार्यालयात बातमी बनवत असताना सहज ‘एबीपी’ माझाच्या कट्याकडे लक्ष गेले. तेव्हा समोर दिसले ते भक्तांचे आधारस्तंभ आणि भले मोठे दांडगे हवामान तज्ज्ञ पंजाब डक साहेब. मग ही मुलाखत बघताना खुप हसू आलं, पण त्याच क्षणी किव आली ती त्यांच्या भक्तांच्या बुद्धीची. कारण त्यांनी मे – जून महीन्यात केलेले अंदाज सफसेल फेल ठरले होते. तरीही हे महाशय कट्यावरून सर्वांना वेड्यात काढून महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतात अफवांचा पाऊस पाडत होते. या मुलाखतीत ते कोणते शास्त्र वापरून पावसाचा अंदाज सांगतात असा प्रश्न विचारला असता त्यांनी जे उत्तर दिले तो सब गोलमाल करणारे होते. ते म्हणाले की, “मला पुढील एक महिना आणि एक वर्षाचा अंदाज कळतो, यासाठी मी रात्री २-३ ला उठून शेतकऱ्यांना मॅसेज पाठवतो. आयएमडीचे जे उपग्रह चित्र असते, ते ३:३० ला बघितल्यास मला आठ दिवसांचा अंदाज समजतो. २:३० चं चित्र बघिल्यास अंदाज करेक्ट येत नाही. इतरांना या चित्रातल काही कळत नाही, मला या चित्रात पाण्याचे ढग दिसतात, ते ढग डोळ्यांच्या नजरेवरून लक्षात येतात.” मला आठ दिवसांचा अंदाज कळतो म्हणणा-या महाशयांना त्यांच्याच गावात त्यांनी ‘संध्याकाळी चार वाजता पाऊस येणार तुम्ही खुशाल पेरणी करा असे शेतकऱ्यांना सांगितले होते, पण हा पाऊस चार वाजता तर पाऊस आलाच नाही तो आठ दिवस कुठे गायब झाला कुणास ठाऊक.’ या महाशयांनी सकाळी जो अंदाज दिला होता तो चार पाच तासानंतर खोटा ठरलेला आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा अंदाज ऐकूण बियाणे मातीत घातले, त्या शेतक-यांना कापसाच्या टुटाळीसाठी चार चार बॅग लागल्या हे किती भक्तांना माहीत आहे ? गावाचा अंदाज वर्तवण्यासाठी या महाशयांनी २:३० चं चित्र बघून की ३:३० चे चित्र बघून अंदाज वर्तवला होता ?. पुढील एक वर्षाचा अंदाज सांगतो म्हणणा-या साहेबांचा अंदाज पाच तासानंतरच खोटा ठरला तरी कसा ? चित्रात बघितलं की तुमच्या डोळ्यांना ढग दिसतात तर मग ते तुम्हाला दिसलेले चित्रातले ढग मोदी शेठने विकले की काय ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

उडत्या विमानाला बघून आणि चालत्या रेल्वेचा आवाज ऐकून अंदाज सांगणारे ह.भ.प. पंबाजशास्त्री गुगळीकर आहेत की गेले विमानात बसून ?

कट्यावर साहेब नंतर ते म्हणाले की, मान्सून आला होता, ‘चक्रीवादळ आलं याचवेळी स्पीड घेतल्याने मान्सून गुजरातकडे वळाला. या ‘वादळाला तीन पंख असतात आणि एक डोळा असतो.’ डोळा जिथे असेल तिथे ढगफुटी, अतिवृष्टी होते. “पंढरपुरच्या दिंडी प्रमाणे मान्सूनची देखील दिंडी आहे, ती अंदमान वरून केरळ-गोवा-मुंबई आणि ६ जूनला महाराष्ट्रात येते.” साहेब वादळाला पंख असतात ते बघायचे तरी कसे ? आज वादळाला पंख असतात यावर जर आम्ही विश्वास ठेवला तर उद्या तुम्ही वादळाला चोच असते, शेपटी असते, शिंगे असतात, लेकरं बायको असते असं म्हटल्यास तुमचे भक्त तरी विश्वास ठेवतील का ? मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाण्याअभावी पीके कोमेजून जात आहेत, तर मग तुम्ही जो दिंडीतल्या वादळाला डोळा सांगितला, त्या डोळ्याला काय मोतिबिंदू झाला की काय ? आजपर्यंत देवस्थानच्या दिंड्या निघतात हे ऐकलं आणि बघितलं होतं पण आता मान्सूनची दिंडी निघतेय आणि ती केवळ तुम्हाला दिसतेय हे नवलच नाही का ? यावर्षी दिंडी नियोजित मार्गाने न येता ती दिंडी गोव्यावरून तिकडे उत्तरप्रदेश हरियाणात गेली का काय हो डक साहेब ? ती मान्सूनची दिंडी, चक्रीवादळाचे पंख आणि त्याचा डोळा तुमच्या भक्तांच्या तरी शेतात मुक्कामी बोलवा. तुमचे भक्त तुमच्यासाठी सोशल मिडीयावर अवैज्ञानिक व अवैचारिक लढाई लढत आहेत. या तुमच्या भक्तांना दिंडीयोध्दा म्हणाव की चिंधीयोध्दा ? एवढं तरी ३:३० च चित्र उल्ट करून सांगा.

त्रिकोणी आकृतीच्या सहाय्याने अमेरिकेमधील पावसाचा अंदाज सांगतो म्हणणारे ह.भ.प. पंबाजशास्त्री गुगळीकर आहेत की गेले वाॅशिंग्टनला ?

कट्यावर विचारण्यात आले की, हा अंदाज बघण्यासाठी साहीत्य काय वापरता. यावर डक साहेब म्हणतात, “भारताचा नकाशा, उपग्रह चित्र बघण्यासाठी एका रडारचा वापर करतो. राज्यातील पावसाचा अंदाज बघण्यासाठी उपग्रह चित्र तर अमेरिकेचा अंदाज सांगण्यासाठी रडारचा वापर करतो. मी इथे बसून अमेरिकेत कोणत्या भागात किती पाऊस पडेल याचा अंदाज सांगू शकतो. पण मी एकटाच असल्याने हे सर्व करू शकत नाही. फोनवर मी सारखं सांगतो दुपारी पाऊस येणार आहे.” ज्या साहेबांना अमेरिकेचा अंदाज सांगतो येतो, त्यांना स्वतःच्या गावातील अंदाज परफेक्ट का कळत नसावा ? यांच्या गावात शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी यांना विचारले त्यावेळी हो बिनधास्त पेरणी करा चार वाजता पाऊस येणार असे सांगितले होते. पण यांनी अंदाज वर्तवल्यानंतर आठ दिवस पाऊस आलाच नाही. यामुळे डक साहेबांनी सांगितलेला अंदाज खोटा ठरतो की खरा रे भक्तांनो ?. डकांना फोनवर वाचारले तर पाऊस दुपारी येतो, आणि प्रत्यक्ष विचारले की, सायंकाळी चार वाजता येतो असंच तर म्हणतात तुमच्या दिलाची धडकन असलेले पंजाब साहेब !. ३:३० चं चित्र बघून पाऊस कळतो तर मग सांगितलेले अंदाज चुकतात तरी कसे ? काय डक साहेब चित्र उल्टे करून बघू लागलात की तुम्हीच शिर्शासन अवस्थेत चित्राकडे पाहू लागलात ? साहेब तुम्ही एकटे असल्याने अमेरिकेचा अंदाज सांगू शकत नसाल तर तुमच्या भक्तांना कामाला लावून बघा की तेवढ, अमेरिकेच्या अंदाजाचे. यातून ज्यो बायडेन ही खुष आणि मोदी सेठचे दोन कोटी तरुणांना नौकरी देण्याचे कामही आपल्या मार्फत पुर्ण होऊन भक्तांच्या हाती चित्राच्या चिठ्ठ्या पडून तेही बि बियाणे उत्पादन करणा-या कंपन्यांच्या मालकांना प्रदीप जोशीसारख्या मिठ्या मारतील. या भक्तांच्या हातात उपग्रह चित्र पडल्यास त्यांच्याही नजरेला आकाशातील ढग आणि त्यातील पाणी बघता येईल. पण प्रश्न पडतो की “डक साहेब रात्री उठून ३:३० च जे चित्र बघून पावसाचा अंदाज वर्तवतात ते मोदी सेठन विकल की काय ?”

जवळ जवळ येणारे डोंगर बघून अंदाज सांगणारे ह.भ.प. पंबाजशास्त्री गुगळीकर आहेत की गेले डोंगराच्या कपारीमध्ये ?

याव्यतिरिक्त पंजाब डक ज्या निसर्गाचा आधार घेऊन पावसाचा अंदाज सांगतात ते ऐकून नवल वाटेल यात तिळमात्र शंका नाही. ते म्हणतात की, “पाऊस येणार मग आपण लगेच येतो अस म्हणायचं” मुलाखतीत त्यांनीच दिलेली उदाहरणात ते म्हणतात की, “पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना आकाश लाल झाले की तीन दिवसात पाऊस येतो.”, त्यात प्राणी पक्षी आणि झाडेही अंदाज सांगतात ते ओळखण्यासाठी सांगतात की, “आपल्या घरातील ट्यूबवर किडे आणि पाकुळ्या आल्या की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार.” या डक साहेबांना सांगा बे भक्तांनो घरातील बल्पवर पावसाळ्या व्यतिरिक्तही किडे घोंगतात तेव्हा पाऊस पडतो तरी कुठे ? ते परत म्हणतात की, “टेरिसवर गेल्यास आकाशातून जाणा-या विमानाचा आवाज ऐकू आल्यास तीन दिवसात पाऊस येतो.” तुम्ही आणि आम्ही सुद्धा भर उन्हाळ्यात विमानाचा आवाज ऐकत आलो आहेत पण कधी तीन दिवसांनंतर पाऊस आला का भक्तांनो ? विमानाचा आवाज ऐकून पंजाबराव डक साहेब पावसाचा अंदाज सांगू लागले म्हणून मोदी सेठन विमान कंपन्याच विक्रीला काढल्या की काय ? साहेब पुढे म्हणतात की, “गुगळी धामणगाव पासून जाणा-या हायकोर्ट एक्स्प्रेसचा आवाज गावात ऐकू आला की, तीन दिवसात पाऊस येतो असे मी शेतकऱ्यांना सांगतो.” रेल्वेचा आवाज ऐकू आल्यास तीन दिवसात पाऊस येतो हे खरं ठरवले तर मग ७ जून ते १८ आॅगस्ट पर्यंत धामणगाव वरून जाणारी हायकोर्ट एक्स्प्रेस मुक्की झाली की, गाववाल्यांनी कानात कापसाचे बोळे घालून घेतले ? यापुढे तर हे महाशय म्हणतात, “गावात सकाळी होणा-या काकड आरतीचा आवाज शेजारच्या गावात गेला की आपण म्हणायच त्या गावात सकाळी नऊ वाजता पाऊस येणार आहे.” बघा यांची करामत पाऊस येवो अथवा न येवो, पण “आपण पाऊस येतो आपणच म्हणायचं म्हणे” असं सांगताना दिसतात. म्हणून तर एक साधा आणि सोपा प्रश्न पडतो की, रेल्वेचा आवाज ऐकून पंजाबराव डक साहेब पावसाचा अंदाज सांगतात म्हणून मोदी सेठने रेल्वे विकायला काढली की काय ? पंजाबराव डक साहेब पुढे म्हणतात की, “आपण दररोज डोंगर बघतो, ते आपल्याला दूर दिसतात. पण, पावसाळ्यात २४ तासात पाऊस येणार असेल तर ते डोंगर जवळ येऊ लागल्याचे दिसतात.” अहो साहेब दूरन साजरे दिसणारे डोंगर एकमेकांच्या पप्या घेताना दिसत आहेत, तरीही पावसाचा थेंब पडताना कुठेच का दिसत नाही. डोंगरही संघाच्या शाखेत सामिल झाले की काय प्रदीप जोशी प्रमाणे माणसांच्या जवळ येऊन खेटू लागली.

मंदीरातल्या घंटेचा आवाज ऐकून अंदाज सांगणारे ह.भ.प. पंबाजशास्त्री गुगळीकर आहेत की गेले भिडे मास्तरच्या दुर्गादौड मध्ये ?

शेतक-यांना चिंच, आंबा, बिबवा, जांभळ या झाडांकडूनही पावसाचा अंदाज समजतो असे डक साहेब म्हणतात. गावरान आंब्यांचे एक वर्षाचा अंदाज सांगते, “ज्यावर्षी गावरान आंबा जास्त पिकला, आणि त्याचा रस तुम्ही जास्त खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो., ज्यावर्षी आंब्याला फुलोरा येतो, त्यावर्षी पाऊस येत नाही.” बघा डक साहेबांच्या बोलण्याची आहे की नाही कमाल. तुम्ही कशाला खाल्ला बे भक्तांनो रस, बघा गेला ना पाऊस तुमच्यामुळे ! कशाला लावता आंब्याचे गावरान झाड, कशाला येऊ देता त्याला फुलोरा या कारणांमुळे तर पाऊस येत नाही असेच तर साहेबांना म्हणणायचे नसेल कशावरून. यापुढे ते म्हणतात की, जांभळीच झाड मे महीन्यात ५० टक्के पिकलं की ते झाड शेतकऱ्यांना म्हणत म्हणे शेतकऱ्यांनो यावर्षी पेरणी लवकर होणार आहे.” बघा बे भक्तांनो तुमच्या साहेबांना जांभळाच्या झाडाने तेव्हाच तर आॅडिओ आणि व्हिडिओ काॅल करून पावसाचा अंदाज सांगितला होता, मग भक्तांनो या जांभळीने तुम्हाला पेरणी उशीरा होणार हा अंदाज सांगितला का नव्हता ? यापूढे डक साहेब म्हणतात की, “चिंचाच्या झाडाला ज्यावर्षी खुप चिंचा लागल्या की ते झाड म्हणत, “शेतकऱ्यांनो तुम्ही यावर्षी मालामाल होणार असं सांगते.” डक साहेब तुम्ही लोकांच्या तोंडी चिचांचे बोटूक देऊन त्यांना मुर्खात तरी किती दिवस काढणार आहेत ? भक्त मुर्खात निघले म्हणून इथे प्रत्येकजण मुर्खच आहे, असे ठरवू नका डक साहेब. आमच्या शेतातील चिंचाला प्रत्येक वर्षी चिंचा न येता त्याला एक वर्ष आडकरून चिंचा येतात. तर काही चिंचाच्या झाडाला दरवर्षी  चिंचा लागतात. मग आम्ही कोणत्या झाडाकडे बघून अंदाज काढायचा साहेब ? आमच्या शेतातील चिंचाच्या झाडाला दरवर्षी चिंचा लागत नसतानाही पाऊस पडतो तरी कसा ? यापुढे आम्ही आमच्या की, शेजा-याच्या चिंचाच्या झाडांची बोटक मोजून पावसाचा अंदाज ठरवायचा ?

सरड्याचे तोंड बघून अंदाज सांगणारे ह.भ.प. पंबाजशास्त्री गुगळीकर आहेत की गेले हिमालयात नागा साधुकडे ?

‘पावसाचे अंदाज सांगताना मला विज्ञान थोडच कामी येत.’ (जो माणूस विज्ञान नाकारतो तो माणूस देवभोळा किंवा बुद्धीभेद करणारा असतो हे निर्विवाद सत्य असताना आमच्यातील येडे पेढेखाऊच समर्थन करतात तरी कसे ?) ‘माझे आजपर्यंत पावसाचे अंदाज कधीच चुकले नाहीत’ असं म्हणणा-या डकांनी ७ ते १७ जुलै पाऊस सांगितला होता. पण पावसाला सुरूवात झाली ती १८ जुलैच्या रात्री. तसेच त्यांनी दुसरा अंदाज वर्तवताना १५ ते १७ सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज दिला होता. पण या चार दिवसात कुठेही पावसाचा थेंब कुठेही पडला नाही, तरीही हे महाशय माझे अंदाज चुकत नाही म्हणत असतील तर हे सर्व वरूनराजाच जाणो आणि त्यांच म्हणण त्यांचे येडे भक्तच माणो !

माझे प्रश्न आणि संघर्ष थेट त्यांच्याशी चालू आहे, जो ३:३० च्या “चिठ्ठ्या” बघून हार्प षढयंत्राला “मिठ्या” मारतो !
यात बडव्यांनी व भडव्यांनी मध्ये पडू नये !

आजारही पावसाचा अंदाज सांगतात असे म्हणताना डक म्हणतात की, “ज्या व्यक्तीला दमा आहे, त्याला आभाळ आल की त्रास होतो. त्याला त्रास झाल्यास दवाखान्यात घेऊन गेले, आणि डाॅक्टरने त्याला तिकडे अॅडमीट केले की, इकडे रात्रीच्याला पाऊस पडतो.” आम्ही जर या डकांच खरं ठरवून बसलो तर भक्तांच्यात आम्ही आमच्यात फरक तो काय ? सरासरी एका गावात पाच व्यक्तींना तरी दम्याचा त्रास होत असेल असे ठरवले, आणि त्यातील दोन व्यक्तींना डाॅक्टरांनी तिकडे अॅडमिट केले आणि तीन व्यक्तींना इकडे घरीच उपचार केले तर मग त्या गावात रात्रीला पाऊस येणार की नाही ? एकाच गावातील दम्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती थोडीच एकाचवेळी आजारी पडून त्या एकाचवेळी डाॅक्टरांकडे अॅडमिट होणार आहेत ? दुसरं ते म्हणतात की, “सरडा पावसाचे अंदाज सांगतो, सरड्याने गळ्याला आणि डोक्याला लाल रंग केला की, सरडा म्हणतो शेतकऱ्यांनो १० दिवसात पाऊस येणार आहे.” अहो डक साहेब सरडा मे महीन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतच दिसतो, तिथून पुढे तो कुठे गायब होतो कुणास ठाऊक, मग त्याने तोंड आणि गांड लाल केली काळी हे कुठं आणि कसे बघायचे ? पुढे डक साहेब म्हणतात की, “घरातल्या काळ्या मुंग्या तोंडात अन्न घेऊन त्या घराकडे घेऊन जाताना दिसल्या की, समजायचं आता ४ दिवसात पाऊस येणार आहे.” अहो साहेब या मुंग्या तोंडात अन्न घेऊन त्यांच्या घरी जायल्या की प्रियकराकराचे घर भरायल्या हे ओळखायचं कसे हेही जरा तुमच्या ३:३० च्या चित्रात बघून सांगा, म्हणजे आम्हाला पाऊसाचा अंदाज मुंग्याही सांगतात हे खरं वाटू लागेल. ते पुढे म्हणतात की, “कावळ्यान त्याच घरट झाडाच्या शेंड्याला केलं की पाऊस कमी होतो, आणि कावळा जेव्हा त्याचे घरटे झाडाचा शेंडा सोडून ३ फुट खाली करतो तेव्हा पाऊस जास्त होतो.” कलाम आहे बाबा साहेब तुमची, तुम्ही किती कावळ्याचे घरचे (खोपा) फुटांच्या टेपाने मोजले आहेत ? या साहेबांना आणि त्यांच्या भक्तांना सांगण आहे की, तुम्ही टेप घ्या आणि पिंपळाच्या झाडावरचे कावळ्या चिमण्याचे खोपे आणि त्याची लांबी रूंदी मोजुन खालून वरून क्षेत्रफळ काढत बसा त्यांच्याशी आमच काही देणंघेणं नाही पण, कावळ्याने बांधलेल्या “खोप्याचे” माप घेऊन संबंध महाराष्ट्राला डकांनी व त्यांच्या भक्तांनी “टोप्या” घालू नयेत !

खेकडे मुंग्या आणि कावळ्याची घरटे टेपच्या सहाय्याने मोजता येणार 

अन् सुकलेल्या पिकांना धीर देण्यासाठी गावागावात पाऊस पाडता येणार !

शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटत की, हार्प तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण नियंत्रीत करण्याच काम अनेक विघातक विकृती करत असून त्याकडे आपणा सर्वांच लक्ष जाऊच नये, यासाठी किड्या मुंग्या, खेकडे आणि घोरपडीच्या तोंडाकडे बघून आणि घंट्या, विमान, रेल्वेचे भोंगे ऐकून चिंचा जांभळीचे आणि कावळ्याच्या घरट्याकडे बघायला लावून अनेक विकृती या हार्पची दलाली करतात असा आमचाही अंदाज आहे ! शेतकऱ्यांनो वेळीच आपल्या भावनेला आवर घाला कारण तुमचे डक साहेब तुमची लायकी काढताना म्हणतात की, “शेतकऱ्यांना त्यांच्या लेव्हलने अंदाज सांगतो.” मग बघा तरुणांनो मुंग्या कावळ्यांच्या चोचीकडे बघून तुमच्या बापाची औकात काढणा-या महाशयांना आपण किती महत्व द्यायचं याचा विचार करा. म्हणून तर शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटत की,
“दरीच्या काठाशी माणूस ठेपला। खुशाल ढकला दरीमध्ये॥१॥
कैसे प्रबोधन करावे झ्याट्याचे। गाढव खुंट्याचे हलेची ना॥२॥
तोंडामध्ये घास घालता चावून। करूनी वमन काढती हे॥३॥
काय घालुनीया कुजक्याला दोरा। शीण विश्वंभरा फुकटचा॥४॥”

३:३० ची चिठ्ठी बघून मिट्ठी मारणा-या गुगळीकरांचा एक कार्यक्रम रद्द करण्यात यश आले
आयोजकांनी मनावर घेतल्याबद्दल त्यांचा मी खुप खुप आभारी आहे.

https://www.gramonnatti.com/panjabrao-takes-money-from-dakh-companies-alleges-a-farmer-in-nashik/

**************************””***********

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

२. भट बोकड मोठा

३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२ , ९७६४४०८७९४

1 Comment
  1. प्रदीप says

    चिकित्सक लेख

Leave A Reply

Your email address will not be published.