श्री. मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाला संभाजी ब्रिगेडचा दणका – छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा अवमानकारक मजकूर हटविण्यास यश

0 80

श्री. मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाला संभाजी ब्रिगेडचा दणका

– छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा अवमानकारक मजकूर हटविण्यास यश

 

पिंपरी, पुणे : संस्कृती पंडीत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमान केल्याप्रकरणी चिंचवडगाव येथील श्री. मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वकिलामार्फत दिला होता. ब्रिगेडच्या दणक्यानंतर महाराजांविषयी अवमानकारक असणारा माहिती फलक अखेर हटविण्यात आला असून त्याबाबत मंदिर व्यवस्थापकाने माफी मागितल्याचे संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे यांना कळविले आहे.

श्री. मोरया गोसावी मंदिर मंदिरात लावलेल्या माहिती फलकावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांचा वध झाला असा अवमानकारक शब्द वापरला होता. यावेळी या घटनेचा निषेध करून आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी ४ ऑगस्ट रोजी दिला होता. या इशाऱ्यानंतर श्री. मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने वध हा शब्द हटवून बलिदान शब्दाचा समावेश केला होता. त्यावर समाधान न झाल्याने त्याविरोधात आक्रमक होत संभाजी ब्रिगेडने कायदेशीर पाऊले टाकली होती. वकील अतुल पाटील यांच्यामार्फत नोटीस पाठवून हा फलक पूर्ण काढून खरा इतिहास सांगणारा फलक लावण्याची मागणी केली होती.

श्री. मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाला वकील अतुल पाटील यांच्यामार्फत नोटीस पाठविण्यात आली होती. ११ ऑगस्ट रोजी नोटीस पाठवून या माहिती फलकातील मजकुर पुर्णपणे काल्पनिक असुन कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास न करता लिहीलेला आहे. सदरचा मजकुर हा माहिती फलकावर तसाच ठेवण्यात आल्यास मंदिरात येणाऱ्या कोणत्याही शिव प्रेमींची भावना दुखवली जाईल. तसेच त्यामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होवू शकते. त्यामुळे ही नोटीस मिळाल्यापासुन दोन दिवसांच्या आत आपल्या मंदिरात लावण्यात आलेला वर नमुद केलेला फलक त्वरीत हटविण्यात यावा, आठ दिवसाच्या आत यावर कार्यवाही करण्याची मागणी नोटीस मध्ये नमूद करण्यात आली होती.
संभाजी ब्रिगेडच्या या दणक्यानंतर श्री. मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने सदरचा माहिती फलक हटविण्यात हटवला असून मंदिर व्यवस्थापनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.