विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाला मागण्यांचे निवेदन

0 58

विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाला मागण्यांचे निवेदन

 

श्रीरामपूर : आर. बी. एन. बोरावके कॉलेज अन् सी. डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही महाविद्यालयात फी भरण्यासाठी साडे दहा ते दोन वाजे पर्यंत वेळ असतो. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्याची अडचण होत आहे. म्हणून महाविद्यालय सुरू असे पर्यंत शुल्क भरण्याचे विभाग चालू ठेवावा. या मागणीचे विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आकाश पंडित, शुभम वायळ, स्नेहल जगताप, दिपाली सोनवणे, अजय राजपूत, प्रथमेश मोरे, अमोल सोनवणे, अश्फाक शेख आदी विद्यार्थी उपस्थित होते.

महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा झाली असता विद्यार्थ्यांनी सांगितले की, महाविद्यालयाने दिलेले कारणे ही खूप छोटी आहेत. या महाविद्यालयाने संस्थेला मिळालेली रक्कम ही संस्थेच्या पतसंस्थेत भरायची असते, ही पतसंस्था बंद झाल्यानंतर दुपारनंतर जी विद्यार्थ्यांनी भरलेली रक्कम ती ठेवायची कुठे ?, त्याची जवाबदारी कोण घेणार अशा प्रकारची सारवासारव करणारी उत्तरे महाविद्यालय प्रशासनाकडून दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या महाविद्यालय प्रशासनाच्या समस्यांना उपाय आम्ही सुचवणार आहोत. अन् तरी देखील आमची मागणी मान्य नाही झाल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा आक्रमक पवित्रा विद्रोही विद्यार्थी संघटनेने घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.