परळी तालुक्यातील सर्व धरणातील पाणी आरक्षित करून 2020 तसेच 2022 चा विमा तात्काळ शेतकऱ्यांना द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

0 44

परळी तालुक्यातील सर्व धरणातील पाणी आरक्षित करून 2020 तसेच 2022 चा विमा तात्काळ शेतकऱ्यांना द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

मागच्या अनेक दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या
– बबन भाऊ गीते

परळी (वार्ताहर) : तालुक्यातील शेतकऱ्यांचा मंजूर असलेला 2020 चा पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा. 2022 चा उर्वरित 75% पीक तसेच परळी तालुक्यातील परळी, पिंपळगाव, सिरसाळा अनुक्रमे 18,21 दिवसाचा खंड पडला असल्याचा अहवाल दिला आहे याचा अर्थ इतर तीन मंडळात नागापूर, धर्मापुरी आणि वडगाव दादाहरी पावसाचा खंड नाही का ? असा चुकीचा अहवाल दिल्याने शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे की असा चुकीचा अहवाल आपण न देता पुर्ण परळी तालुका अवर्षणग्रस्त असल्याचा अहवाल शासनास द्यावा अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे कर्ज माफ करण्यात यावे अग्रीम 50% तात्काळ देण्यात यावे. पावसाळ्यातील अडीच तीन महिने संपून सुद्धा पाहिजे तसा पाऊस झाला नाही त्यामुळे धरण साठ्यातील पाणी पातळी खूप कमी झाली आहे. पुढील काळात पाण्याची परिस्थिती उद्भभण्याच्या अगोदर परळी तालुक्यातील सर्व धरणातील पाणी आरक्षित करावे. तसेच अडीच तीन महिने झाले पाऊस नसल्यामुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पिकावर 50% परिणाम झाला आहे.सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यासह अनेक पिकावर पाऊस नसल्याकारणाने खूप मोठा परिणाम झाला आहे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानापोटी हेक्टरी एक लाख मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही करत असून प्रशासनाला विनंती आहे की येणारा काळ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप नुकसानदायक असल्यामुळे अनुदान व पीक विमा तात्काळ देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम प्रशासनाने करावे. ही विनंती. अन्यथा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बबन भाऊ गीते, तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष जीवनराव देशमुख, कार्याध्यक्ष महबूब शेख, युवक तालुकाध्यक्ष शंकरराव शेजुळ, तालुका उपाध्यक्ष भागवत गीते, युवक शहर अध्यक्ष सय्यद फिरोज यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.