निरोप समारंभ कार्यक्रमात सराना अश्रुअनावर माजी विदयार्थी यांनी घेतला निरोप समारंभ कार्यक्रम

0 322

निरोप समारंभ कार्यक्रमात सराना अश्रुअनावर
—————————————
माजी विदयार्थी यांनी घेतला निरोप समारंभ कार्यक्रम
—————————————-

मारेगाव (लहु जिवतोडे): आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षिका विषयी एक वेगळी गोडी निर्माण होते तेव्हा एक वेगळा जिव्हाळा निर्माण होते जिल्हा परिषद शाळेतील माजी विदयार्थी यांनी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले.

जिल्हा परिषद शाळा सिंधी येथील शिक्षक आणि शिक्षिका दोघांची बदली करण्यात आली होती. मागील १२ वर्षापुर्वी रुजू झाले होते. गौरव चिकटे सर आणि काकडे मॅडम विद्यार्थ्यानं मध्ये लवकरच प्रिय शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली होती. गौरव चिकाटे सर यांची बदली सागणापुर शाळेवर झाली आणि काकडे मॅडम यांची बदली गोंडबुराडा येथील शाळेवर झाली आहे. निरोप समारंभ कार्यक्रमात चिकाटे सर यांनी सिंधी गावातील जिल्हा परिषद शाळा येथे १२वर्ष सेवा दिली. येवढे वर्ष शिक्षक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यावर गावातील लोकांच्या मनात जिव्हाळ्याची भावना निर्माण केली होती.

१२ वर्ष शिक्षक म्हणून सेवा देऊन चांगले विदयार्थी घडवले आणि एक विद्यार्थ्यानं मध्ये मैत्रीचं नातं निर्माण करू
बऱ्याच गोष्टीना उजाळा देत बोलता बोलता गौरव चिकाटे सर यांना अश्रु अनावर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लहू जीवतोडे यांनी तर प्रास्ताविक वैष्णवी ढवस यांनी केले, माजी विदयार्थी यांनी निरोप समारंभ कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. यावेळी चंद्रशेखर ढवस, बंटी ढवस,मयूर उमरकर,प्रतीक्षा गाडगे,कल्याणी नेहारे,वैष्णवी ढवस कृष्णा नागोसे इ. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधार समिती अध्यक्ष किशोर भाऊ उमरकर प्रमुख उपस्थिती सरपंचा सौ नीलिमा ताई थेरे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भाऊ डाहुले,चंद्रशेखर ढवस.गणपतजी नागोसे प्रमोद भाऊ झाडे राहुल भाऊ पोतराजे , भाऊराव जी निब्रड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सिंधी गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन बंटी ढवस यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.