वाडी गावात स्मशानभूमीचा अभाव

0 141

वाडी गावात स्मशानभूमीचा अभाव

 

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे) : देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ होऊन गेली. मागच्याच वर्षी मोठा गाजावाजा धुमधडाकात अमृतमहोत्सवी वर्ष पार पडल. पण खामगाव पासून दोन किलोमीटर असलेल्या वाडी गावात अजूनही पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्थापनासाठी नाल्या आणि स्मशानभुमीचा पत्ताच नाही हे दुर्दैव आहे. अजून किती वर्षानंतर या गावात मुलभूत सुविधांची पुरवण्या केली जाणार आहे याच उत्तर शासन प्रशासनाने गावक-यांना दिलं पाहीजे.

कोरोना कळात मृतदेहाचे पडलेले खच, त्यासाठी स्मशानभूमीची पडणारी कमतरता पाहून सरकारने गाव तिथे स्मशानभूमी ही संकल्पना राबवून प्रत्येक गावात स्मशानभूमी जागा व निधी उपलब्ध करून दिला. मात्र वाडी गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ‘जागा देता का जागा निधी देता का निधी’ असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

वाडी हे जळवळापास आठ दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे, इथे सर्वच राजकीय पक्षाच्या सरपंची कारभार केला पण गावच्या मुळ प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न न होणं हे मतदारांच्या मताची हेळसांड आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपयांची उधळण करत प्रत्येक गावाला स्मशानभूमी बांधून दिली जात आहे. मात्र वाडी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

आजपर्यंत शासनाच्या घरकुल योजने अंतर्गत वाडी गावात एकाही ओबीसी कुटुंबाला पक्के घर न मिळाल्याने ही योजना केवळ कागदावरच राबवण्यात येत असावी अशी चर्चा नागरिकांमध्ये असल्याने याकडे मतदारसंघाचे प्रतिनिधी व महाराष्ट्र सरकार कधी लक्ष देणार आहे.

गावात स्मशानभूमी नसल्याने मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून गावातील नागरिकांनी गावाच्या बाहेर एका ठिकाणी लोकवर्गणीतून एक पत्र्याचे शेड मारले. आठ दहा हजार लोकसंख्येच्या गावात एकच स्मशानभूमी असावी तेही लोकांनी लोकांच्या पैशातून उभारलेली तर मग सरकार आणि प्रतिनिधी नेमकं करतात तरी काय ? असा प्रश्न नागरिकांना पडत असल्याने सरकारने याकडे वेळीच लक्ष दिले पाहीजे.

Leave A Reply

Your email address will not be published.