कोरोना लसीची मागणी शून्य, लशींचे 60 लाख डोस पडून

0 112

कोरोना लसीची मागणी शून्य, लशींचे 60 लाख डोस पडून

 

Covid19 Vaccine:  भारतात  कोरोना (Corona) प्रकरणांमुळे लोकांना पुन्हा एकदा मास्कची चिंता वाढत आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2.20 अब्ज लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाचा धोका तितका गंभीर नाही, लोकांमध्ये दिसत असेलली कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. ज्येष्ठ नागरिक केवळ खबरदारीच्या उपायांसाठी बूस्टर डोस घेऊ शकतात, परंतु बुस्टर डोस घ्यायचा की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल अस वक्तव्य सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी केले.

कोरोना लशींबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)चे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सीरमकडे कोरोनाच्या 50 ते 60 लाख लशींचे डोस असून रुग्णालयांकडून मागणी मात्र शून्य असल्याचं वक्तव्य केले. आमच्याकडे कोरोना प्रतिबंधक लशींचे पाच ते सहा दशलक्ष डोस उपलब्ध आहेत, परंतु रुग्णालयाकडून कोरोना लशींची मागणी होत नसल्याचे ते म्हणाले. येत्या दोन ते तीन महिन्यांत सीरम इन्स्टिट्यूट आणखी कोविशील्ड डोस देखील तयार करणार आहे. आम्ही 5 ते 6 दशलक्ष कोरोना लशींचे डोस तयार ठेवले आहेत. मात्र रुग्णालयांकडून कोरोना प्रतिबंधक लशींची मागणी शून्य आहे, कोरोना लशींची मागणी थांबली आहे. पुढे ते म्हणाले, कोरोना विषाणूचा सध्याचा प्रकार फारसा गंभीर नसून ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी म्हणून बूस्टर डोस घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.