चला हवा सोडू या !

0 81

चला हवा सोडू या !

 

रेपे नवनाथ दत्तात्रय
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक 
मो. ९७६२६३६६६२

 

बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता तेव्हा महात्मा जोतिबा फुले सावित्रीमाई फुले यांनी मनुवादी त्रासाला शह देऊन बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं सताड उघडी केली पण जसं गाडूळांमुळे खत निर्मिती होते तसं शिक्षणामुळे बहुजन समाजात जास्तीत जास्त चांगली लोक तयार होतील असं वाटतं होतं पण चांगली बोटावर मोजण्याऐवजी अन् बाळगुळांचीच निर्मिती जास्त झाली असे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण दि. ०९ व १० मार्च रोजी झी मराठी वर प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या मुळ प्रतिमेचे फोटोशॉप करून स्वत:चे थोबडे चिपकवून आपला बांडगुळपणा सिध्द करणारे बहुजन समाजातीलच होते म्हणून तर त्यांना सागावं वाटत की, स्वत:च्या बुद्धीची बौध्दीक वेश्यागिरी करू नका. याविषयी विद्रोही कवी विश्वाभंर वराट म्हणतात की,
‘महापुरूषांच्या अवमानाचे
कशाला करताय उपद्व्या
फार तर फोटोशाॅप करून
बदलून घ्या की तुमचे बाप’.
झी मराठी वर प्रसारित होणारा कार्यक्रम हा ‘चला हवा येऊ द्या‘ असा असला तरी तरुणांनो चला आता या विकृत अभिनेत्यासह झी मराठीचीही ‘चला हवा काढू या …!’
आरक्षाणाचे जनक, अस्पृश्यता निवाराण व स्वत:ची बहीण धनगर समाजात देऊन आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहु महाराज तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करणारे बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची असलेली प्रतिमा झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सोमवार व मंगळवार दि. ०९ व १० मार्च रोजी झालेल्या शोमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मुळ प्रतिमेचा फोटोशॉप करून त्या महापुरूषांच्या ऐवजी कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचे फोटो लावले ही खुप मोठी शोकांतिका आहे.
झी मराठी आणि त्यांचे निवदेक निलेश साबळे व कलाकार कुशल बद्रीके आणि भाऊ कदम यांना सांगावे वाटते की, बापाचं खेटरं पोराच्या पायाला आलं म्हणजे पोरगं बाप होत नसतं. तसेच तुम्ही शेळीप्रमाणे आहात हे कदापीही विसरून वाघाची कातडी पांघरूण वाघ बनण्याचा प्रयत्न करू नका, कारण कितीही कातडी पांघरली तरी तुमची शेपटी तुमचं अस्तित्व नक्कीच दाखवते.
घडलेल्या अशोभनीय प्रकाराबाबत संभाजी ब्रिगेडने झी मराठी ला दिलेल्या निवेदनात म्हटले की, झी मराठी व त्यांच्या सर्व कलाकारांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा कलाकारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे सांगून सोलापूर येथे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखलही केली आहे.
तसेच खा. संभाजी महाराज यांनीही म्हटले की, लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या‘ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनीने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरी मध्ये रूपांतरित केले होते. महाराज सयाजीराव गायकवाड यांचे योगदान ही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, कार्यक्रमात जी प्रतिमा दाखवून नंतर फेकून दिली जाते. हा भयानक प्रकार केला जातो. यात ‘महापुरुषांचा’ अपमान करण्याचा हेतू नक्कीच आहे. यामागचा ‘मेंदू’ शोधला पाहिजे. कारण हा सांस्कृतिक दहशतवाद आहे असे म्हणाले. तसेच डाॅ. बालाजी जाधव म्हणतात की, महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मुळ तसबीरीला फोटोशॉप करून आपले पांचट थोबाड चिकटवणारे (अ) कुशल बद्रिके आणि भाऊ कदम हे महापांचट टुकार तमासगीर अतिशय थर्ड क्लास विनोद आणि पांचट पंच मारून आपल्या ब्राह्मण मालकांना खुश करतात पण केव्हाच हवा निघून गेलेल्या ‘चला हवा येऊ द्या‘ मधील घडलेल्या निंदनीय प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
तसेच फेसबुकवर आपला निषेध व्यक्त करताना भारत पवार म्हणतात की, झी ग्रुप तसा तर २०१३-१४ पासूनच माजलेला दिसून येतो. देशातील मिडीया आणि एकूणच टेलिव्हीजनचे क्षेत्र त्या भांडवलदार मालकाने सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून नासवून टाकले आहे. त्यांना वेळीच धडा शिकवण्याची गरज आहे असे म्हणाले.
महापुरुषांच्या अवमानाच्या प्रकाराबद्दल संतोष शिंदे यांनी कुशल बद्रीके यांना संपर्क करुन सदरील प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बद्रीके यांचं वक्तव्य आणि त्यांची भाषाशैली ही एखाद्या मस्तवाल वळूसारखी वाटली कारण कुशल यांचं वक्तव्य ऐकून त्यांची बुद्धी अकुशलच आहे असही दिसलं. पण सविंधानिक मार्गांने असे मस्तवाल वळू ठेसून त्यांना वेसनही घालता येते हे याची जाणिव बद्रीके विसरलेले दिसले कारण गुन्हा करूनही जर कुशल बद्रीके हे चोरावर मोर होण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचा प्रतीपुरंदरे होईल. याविषयी विद्रोही कवी विश्वाभंर वराट म्हणतात की,
‘आमच्या महापुरूषा बरोबर
जे असे वागतात
कदाचीत पुरंदरेचा डीएनए
असेल यांच्या रक्तात’.
घडलेल्या प्रकाराबद्दल निवेदक निलेश साबळे यांनी झी वाहिनीच्या माध्यमातून माफी मागितली. याविषयी विद्रोही कवी विश्वाभंर वराट म्हणतात की,
‘पांचट विनोद सोडून आता
विचार पेरावा नवा
नाही तर तुमच्या अकलेची
काढावी लागेल हवा‘.
शेवटी सांगावं वाटतं की, आमचेच बहुजन समाजातील बांडगुळ जर ब्राम्हणी मेंदूतून निघालेले विचार घेऊन आमच्या बहुजन महामानवांचा अवमान करून परत आमच्याशीच जर अरेरावीची भाषा वापरत असतील तर बहुजन समाजासह चळवळीतील तरुणांनी एकत्र येऊन या मस्तवाल बांडगुळांची हवा काढून त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे अन्यथा असे मस्तवाल वळू परत उत्पात माजवून लोकांच्या मनावर वेगळाच इतिहास बिंबवतील.
Leave A Reply

Your email address will not be published.